Bhojpuri song Jila Top Lagelu gets the British jamming on london streets watch viral video | लंडनच्या रस्त्यावर भोजपुरी गाण्यावर गोऱ्यांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
लंडनच्या रस्त्यावर भोजपुरी गाण्यावर गोऱ्यांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

भोजपुरी गाणी नाही म्हणता म्हणता दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रियता मिळवत आहेत. याची उदाहरणं तुम्ही वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये बघितली असतीलच. लग्नात, पार्टीमध्ये या भोजपुरी गाण्यांवर ठेका धरण्यात अनेकांना एक वेगळीच मजा येते. आता तर एक गाणं थेट लंडन गाजलं आणि याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. 

लंडनमध्ये वर्ल्ड कप २०१९ चे सामने खेळले जात आहेत. क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी इथे जमली आहे. याआधी लंडनमधील एका मैदानाबाहेर भेळ विकणाऱ्या व्यक्तीटा व्हिडीओ व्हायरल झाला होता, आता भोजपुरी गाण्यावर इंग्रजांनी ठेका धरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडन च्या रस्त्यावर परदेशी लोक भोजपुरी 'लॉलीपॉप लागेलू' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. 


हा व्हिडीओ सध्या फेसबुक, ट्विटक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला जात आहे. व्हिडीओ एक ट्रक दिसत आहे. त्यात काही लोकही आहेत. आणि डीजेवाल्याने देसी गाणं लावलंय. टॅकच्या मागे परदेशी लोक गर्दी करून नाचताना दिसत आहेत.


Web Title: Bhojpuri song Jila Top Lagelu gets the British jamming on london streets watch viral video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.