अस्वलाने तब्बल तीनदा हल्ला केला, तरीही सर्कस ठेवली सुरु, मग झाली 'अशी' अवस्था...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 20:40 IST2021-07-19T20:39:34+5:302021-07-19T20:40:52+5:30
सर्कशीमध्ये जे काही जंगली प्राण्यांचे हाल केले जातात त्यामुळे हे प्राणी बिथरतात. या प्राण्यांना कितीही ट्रेन केलेले असले तरीही हे प्राणी अशावेळी आपल्या मुळ स्वभावाप्रमाणे वागतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

अस्वलाने तब्बल तीनदा हल्ला केला, तरीही सर्कस ठेवली सुरु, मग झाली 'अशी' अवस्था...
सर्कशीमध्ये जे काही जंगली प्राण्यांचे हाल केले जातात त्यामुळे हे प्राणी बिथरतात. या प्राण्यांना कितीही ट्रेन केलेले असले तरीही हे प्राणी अशावेळी आपल्या मुळ स्वभावाप्रमाणे वागतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात एका अस्वलाने त्याला ट्रेन करणाऱ्या ट्रेनर महिलेवर तीनदा हल्ला केला आहे.
सर्कसचा शो सुरु असताना हे अस्वल स्कार्फ आणि टोपी घालुन आले. त्या ट्रेनरला बघताच ते तिच्या पायाचा चावा घेण्यासाठी धावलं. त्याने तिचा स्कर्ट तोंडात पकडला. त्यावेळी दोन ट्रेनर लगेच तिथे आले आणि त्यांनी कसंबसं त्या अस्वलाला आवरलं. इतकं होऊनही ही महिला ट्रेनर शांत बसली नाही. तिने हा शो पुन्हा सुरु केला व अस्वलाने पुन्हा तिच्यावर हल्ला केला. यानंतरही तिने पुन्हा शो सुरु करण्यापासून माघार घेतली नाही. अस्वलानेही तिच्यावर तिसऱ्यांदा हल्ला केला.
ही घटना रशियात घडली असून याबाबत काही नियमांचे उल्लघंन झाले आहे का? याचा शोध तेथील पोलिस घेत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होऊनही त्या सर्कशीतर्फे असा कोणताही हल्ला न झाल्याचे सांगितले आहे.