शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अरे बाप रे! प्रचंड गर्दी, तरुणाचा बसच्या मागे लटकून जीवघेणा प्रवास; व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 14:06 IST

जीवाची मुंबई म्हणणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक सेवांमध्ये वाढत चाललेली गर्दी ही समस्या गंभीर बनत चालली आहे. रोजच्या रहाटगाड्यात प्रवासातील कसरत किंवा प्रवासात करावी लागणारी चढाओढ हे एक भीषण वास्तव आहे. 

Viral Video : मुंबई आणि तेथील वाढती गर्दी हे न सुटणारे कोडे आहे. वाढती गर्दी, नागरिकांचे मुंबईत होणारे स्थलांतर आणि त्याचा जनमानसावर होणारा परिणाम हा चर्चेचा विषय आहे. त्यातच बस, ट्रेन अशा सार्वजनिक सेवांमधील गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.  प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना नागरिकांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. अशा तुडूंब गर्दीतून मुंबईकरांचा प्रवास असतो. याचाच प्रत्यय देणारे एक उदाहरण समोर आले आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी जीवावर उदार होऊन लोक प्रवास करतात. मुंबईसारख्या शहरात नोकरदार वर्ग तसेच सर्वसामान्यांची प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांना सर्वाधिक पसंती असते.

आपल्या ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी प्रत्येकाचा खटाटोप चालू असतो. अशी बरीच प्रकरणे आपण पाहिली असतील. त्यात नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक  विद्यार्थी बसच्या मागे लटकून प्रवास करत आहे. 

अनेकदा बस किंवा ट्रेनमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या गर्दीत उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे बसला लटकून किंवा धावती बस पकडण्याचे जीवावर बेतणारे साहस प्रवासी करताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण बसच्या मागे उभा राहून प्रवास करतोय. मुंबईच्या वांद्रे परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. २९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडीओमध्ये बसला प्रचंड गर्दी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गर्दीपासून वाचण्यासाठी या विद्यार्थ्याने हा पर्याय निवडला. आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण प्रवास करताना दिसत आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर