चुलीवरील मटण, चिकननंतर आता मार्केटमध्ये आले चुलीवरचे बाबा, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:44 PM2023-03-23T12:44:14+5:302023-03-23T12:45:13+5:30

Viral Video : हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण बाबा एका लोखंडी ताव्यावर ज्याच्याखाली आग पेटली आहे त्यावर बसला आहे.

Baba sit on the stove video goes viral you will shocked | चुलीवरील मटण, चिकननंतर आता मार्केटमध्ये आले चुलीवरचे बाबा, बघा व्हिडीओ

चुलीवरील मटण, चिकननंतर आता मार्केटमध्ये आले चुलीवरचे बाबा, बघा व्हिडीओ

googlenewsNext

Viral Video : नेहमीच वेगवेगळ्या बाबांच्या घटना समोर येत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. जे बघून लोक हैराण होतात. काही बाबा अनेक महिने एकाच पायावर उभे असतात तर काही बाबा अजिबात झोपत नाहीत. कुणी कपडे घालत नाहीत तर काही बाबा आजार दूर करण्याचा दावा करतात. यातच एका नव्या बाबाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. ज्यात हा बाबा एका जळत्या चुलीवर बसलेला आहे. 

हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण बाबा एका लोखंडी ताव्यावर ज्याच्याखाली आग पेटली आहे त्यावर बसला आहे. चुलीमध्ये आग इतकी लागली आहे की, सहजपणे भाकरी आणि पोळ्या भाजल्या जातील. बाबाजवळ त्यांचे भक्त येऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत. तुम्ही बघू शकता की, बाबा धोतर घालून आणि विडी पित तापलेल्या ताव्यावर बसले आहेत. 

हा व्हिडीओ @Liberal_India1 नावाच्या एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. असं सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ अकोल्यातील आहे. यूजरने क्लीप शेअर करत कॅप्शन दिलं की, 'चुलीवरचं मटण, मिसळ, आइसक्रीमनंतर आता चुलीवरचे बाबा बाजारात आले आहेत'. आतापर्यंत या व्हिडिओला 62 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. साधारण दोन हजार लोकांनी लाइक केला आणि 300 लोकांनी कमेंट केल्या आहेत.

व्हिडिओवर लोक भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, आमच्या अकोला जिल्ह्यात गेल्या 4-5 वर्षापासून गुणवंत नावाचे बाबा लोकांकडे येत असतात. त्यांचा दरबार नेहमीच भरलेला असतो. लोक त्यांना मानतात. या बाबाला भेटण्यासाठी लोक दूरदरून येतात. 
 

Web Title: Baba sit on the stove video goes viral you will shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.