Viral Video : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याला सोमवारी सुरूवात झाली. कडाक्याच्या थंडीतही कोट्यावधी भाविकांनी आणि साधुंनी इथे हजेरी लावली आहे. एका रिपोर्टनुसार, या मेळाव्यात ४५ कोटींपेक्षा अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज आहे. हा एक यादगार धार्मिक सोहळा ठरणार आहे. अशात सोशल मीडियावरही मेळ्यातील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात साधुंची माहितीही दिली जात आहे. तर काही मजेदार व्हिडिओही समोर येत आहेत.
या मेळाव्यात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हिडीओ बनवत आहेत. साधुंच्या तंबूमध्ये गेलेल्या एका यूट्यूबरला चांगलंच महागात पडलं. इथे एका साधुनं यूट्यूबर व्यक्तीला चिमट्यानं मारून मारून झोपडीतून बाहेर हाकलून दिलं. यूट्यूबर साधुला काहीतरी प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर साधू संतापले.
इन्स्टाग्राम अकाऊंट @janta_darbaar123 वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला १८.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकांनी यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.
एका यूजरनं लिहिलं की, 'असंच होतं जेव्हा तुम्ही एखाद्या साधुला मूर्ख प्रश्न विचारता'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'यूट्यूबरनं खरंच सीमा पार केली होती. तुम्हीही काहीही विचारू शकत नाही'. तर तिसऱ्यानं लिहिलं की, 'हिंसा करणं बरोबर नाही. साधुनं त्याला शांतपणे सांगायचं असतं.