छतरपूर जिल्हा रुग्णालयात बाबाचा हाय होल्टेज ड्रामा; कर्मचाऱ्यांसह लोकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:39 IST2022-01-17T21:38:49+5:302022-01-17T21:39:24+5:30
मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी १३ तारखेला एक बाबा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता

छतरपूर जिल्हा रुग्णालयात बाबाचा हाय होल्टेज ड्रामा; कर्मचाऱ्यांसह लोकांमध्ये दहशत
छतरपूर – मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयात एका बाबानं मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. बाबा कधी हॉस्पिटलमध्ये बेडवर योगा करताना दिसले तर कधी दरवाजावर लटकतानाची दृश्य पाहायला मिळाली. बाबा इतक्यावरच थांबले नाहीत तर हॉस्पिटलमधील प्रत्येक कर्मचाऱ्याचा बाबाने अक्षरश: छळ केला. याठिकाणी काहींनी बाबाच्या कारनाम्याचा व्हिडीओ बनवत होते तेव्हा त्यांनाही बाबाने मारण्याचा प्रयत्न केला. काही लोकांच्या मागे बाबा हात धुवून लागला.
१३ जानेवारीला बाबा रुग्णालयात दाखल झाले
मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी १३ तारखेला एक बाबा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. परंतु उपचारास विलंब झाला त्यामुळे बाबानं रुग्णालयातच गोंधळ घातला. जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी बाबावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर डॉक्टरांनी या बाबावर उपचार केले.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, बाबाची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बाबांना आणलं होतं. परंतु याठिकाणी बाबाने बराच गोंधळ घातला. जेव्हा पोलिसांनी या बाबाला ठाण्यात आणले तेव्हा बाबा आसन करायला लागले. या बाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.