शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

VIDEO:"काय आहे लुलु..लोलो..डूलू..डोलो...", आझम खान यांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:26 IST

उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ येथील लुलु मॉल आपल्या उद्घाटनासोबतच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ येथील लुलु मॉल आपल्या उद्घाटनासोबतच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलीकडेच या मॉलमध्ये नमाज अदा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर हा मॉल खूप चर्चेत आला आणि अनेक हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला. मॉलमध्ये नमाज अदा करत असल्याची घटना उघडकीस येताच हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने इशारा देत ​​म्हटले होते की, जर मॉलमध्ये पुन्हा नमाज अदा केली गेली, तर त्यांना येथे सुंदर कांड पठण केले जाईल. 

हिंदू संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हा वाद चिघळत गेला आणि काही लोकांनी लुलु मॉलमध्ये घुसून हनुमान चालीसाचे पठण करण्यास सुरूवात केली. याची पोलिसांना माहिती मिळताच दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र आता समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांनी या मॉलबद्दल एक मजेशीर टिप्पणी केली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मॉलच्या वादावर मी काय बोलू अस म्हणत त्यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. 

आझम खान यांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा

लुलु मॉलमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केल्याने हा मॉल चर्चेचा विषय बनला. मॉल व्यवस्थापन आतमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक प्रार्थनेला परवानगी देऊ शकत नाही, अशी नोटीस लावल्यानंतरही मॉलमध्ये हनुमान चालीसा पठण सुरू असल्याचे दिसून आले. मॉलमधील प्रत्येक मजल्यावर यासंबंधीच्या नोटिसाही लावण्यात आल्या होत्या. त्याचवेळी, या घटनेनंतर लखनौचे पोलीस उपायुक्त यांची त्या ठिकाणाहून बदली करण्यात आली. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आझम खान यांनी काय आहे लुलु..लोलो..डूलू..डोलो... असं म्हणत या प्रकरणावर मजेशीर टिप्पणी केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMuslimमुस्लीमNamajनमाजHinduहिंदू