‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर डान्स करणारी आएशा वेस्टर्न लूकमध्येही दिसते लयभारी, पाहा खास Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:47 IST2022-12-01T18:47:24+5:302022-12-01T18:47:36+5:30
मेरा दिल ये पुकारे आजा... या गाण्यावर आएशानं केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर डान्स करणारी आएशा वेस्टर्न लूकमध्येही दिसते लयभारी, पाहा खास Photos
पाकिस्तानी गर्ल आएशा सध्या सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे. मेरा दिल ये पुकारे या गाण्यावर सलवार सूट घातलेला तिचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी तिच्या डान्सला पसंती दिली होती.
तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्याचा व्हिडीओ तुमच्या समोर आला असेल किंवा तुम्ही पाहिला असेल. या गाण्यावर आपल्या डान्स मुव्हसने सर्वांना भुरळ पाडणारी पाकिस्तानी मुलगी आएशा सध्या खूप चर्चेत आहे. साध्या सलवार सूटमध्ये राहणारी आयशाचे वेस्टर्न लूकमधील फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानी गर्ल आएशा सोशल मीडिया सेन्सेशन बनली असून आता लोक तिला व्हायरल गर्ल म्हणू लागले आहेत. व्हिडीओमध्ये एथनिक लूकमध्ये दिसणाऱ्या आएशाचे काही ग्लॅमरस फोटोही समोर आले आहेत. आएशानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, तिचा मेरा दिल ये पुकारे या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.