Video : जबरदस्त!'रोके ना रुके नैना', अरिजित सारख्या आवाजात दिल्ली पोलिसानं गायलं गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:28 IST2023-02-23T18:27:43+5:302023-02-23T18:28:23+5:30
एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे.

Video : जबरदस्त!'रोके ना रुके नैना', अरिजित सारख्या आवाजात दिल्ली पोलिसानं गायलं गाणं
सोशल मीडियाच्या आपल्याला अनेक सुंदर व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिल्ली पोलीस कर्मचारी गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेले पोलीस कर्मचारी हातात माइक घेऊन स्टेजवर गायक अरिजित सिंगचं हिट गाणं गाताना दिसतायत.
सामान्यतः पोलीस गुन्हेगारांना अटक करताना आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमुळे दिल्ली पोलिसांची वेगळीच प्रतिमा निर्माण होत आहे. व्हिडीओमध्ये दिल्ली पोलीस हवालदार रजत राठोड स्टेजवर अरिजित सिंगचे 'रोके ना रुके नैना' गाणे गाताना दिसत आहेत. त्यांचं गाणं सर्वांच्याच मनात घर करून गेलंय.
व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रजत राठोड यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रजत राठोड गिटार वाजवताना रोके ना रुके नैना गाताना दिसत आहेत. यादरम्यान इतर काही पोलीस वाद्य वाजवताना रजत राठोडला साथ देताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करण्यासोबतच 'रोके ना रुके नैना, माझ्या आवडत्या रचनांपैकी एक' असे कॅप्शन दिले आहे.