Viral Photo : टॉयलेट पॉटमध्ये अजगर पाहून ओरडली अन् नंतर असं काही झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:26 IST2019-10-09T15:25:44+5:302019-10-09T15:26:13+5:30
जर तुम्हाला घराच्या बाथरूममध्ये साप दिसला तर..? आणि एवढचं नाहीतर जर दोन दिवसांत दोन वेगवेगळे साप बाथरूममध्ये दिसून आले तर...?

Viral Photo : टॉयलेट पॉटमध्ये अजगर पाहून ओरडली अन् नंतर असं काही झालं...
जर तुम्हाला घराच्या बाथरूममध्ये साप दिसला तर..? आणि एवढचं नाहीतर जर दोन दिवसांत दोन वेगवेगळे साप बाथरूममध्ये दिसून आले तर...? घाबरलात ना... तुम्ही तर फक्त कल्पना करून एवढं घाबरलात मग विचार करा की, ज्या व्यक्तीसोबत ही घटना खरीखुरी घडली असेल त्याची अवस्था काय झाली असेल...
ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या बाथरूममध्ये दोन साप पाहिले. जो पाहिल्यानंर ती हैराण झाली. क्रेएंसमध्ये राहणारी निकोल एर्रे शुक्रवारी जेव्हा आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने टॉयलेट पॉटमध्ये अजगर पाहिला. 'डेली मेल' सोबत बोलताना तिने पाहिले की, 'मी जेव्हा कामावरून घरी परतले आणि बाथरूममध्ये गेले. त्यावेळी टॉयलेट पॉट ओपन होता आणि त्यामध्ये अजगर होता.'
निकोलने लगेच क्रेएंस स्नेक रिमूवल्सला बोलावलं, त्यानंतर तिने अजगरचा फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला. फोटोमध्ये अजगर टॉयलेट पॉटमध्ये बसलेला दिसत आहे. काही वेळाने अजगर टॉयलट पॉटमधून बाहेर आला आणि त्यानंतर वॉश बेसिनजवळ गेला.
प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी निकोलच्या बाथरूममध्ये आणखी एक साप दिसला. 'डेली मेल'शी बोलताना तिने सांगितलं की, 'मी तिथे पोहोचली आणि पाहताच क्षणी पळून गेली. मी खरचं हैराण झाले होते. मला समजतच नव्हतं की, माझ्याच घरात का अजगर येत आहेत?'
क्रेएंस स्नेक रिमूवल्सने पुढच्या दिवशी आणखी एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'आज आम्हाला त्याच पत्त्यावर आणखी एक अजगर मिळाला. टॉयलेटच्या आतमध्ये आणखी एक अजगर होता. दोन साप दोन दिवसात मिळाले.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक साप या सीझनमध्ये जंगलातून बाहेर पडतात आणि टॉयलेट पाइपलाइनमार्फत घरांमध्ये जातात.