शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Austin Stanley Video : डिलिव्हरी बॉय ते यशस्वी कंटेट क्रिएटर; असा आहे व्हायरल बॉय ऑस्टिन स्टॅनलीचा प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:35 IST

Austin Stanley Viral Video : ऑस्टिन स्टॅनलीचे सुंदर-सुंदर मुलींसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

Austin Stanley Viral Video : वरील फोटोत दिसणाऱ्या तरुणाचे नाव ऑस्टिन स्टॅनली (Austin Stanley) आहे. तुमच्यापैकी अनेकांना याचे नाव माहित नसेल, पण याचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. एकेकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा ऑस्टिन स्टॅनली आता सोशल मीडिया सेंनसेशन बनला आहे. मीम्स असो किंवा रील्स, सर्वत्र त्याचीच हवा आहे. त्याचे छोटे आणि मजेशीर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. 

ऑस्टिन स्टॅनली मूळचा केरळचा असला तरी तो नवी मुंबईतच लहानाचा मोठा झाला. तो इंडियन शॉर्ट व्हिडिओ अॅप्लिकेशन Moj वर व्हिडिओ बनवतो. त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. Moj वर त्याचे 22 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो पूर्वी 6 दिवस डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा आणि सुट्टीच्या दिवशी व्हिडिओ बनवायचा.

आपल्या या आडीबद्दल ऑस्टिन म्हणतो की, त्याला सुरुवातीपासूनच व्हिडिओ बनवण्याची आवड होती. सुरुवातीला त्याचे व्हिडिओ चालत नव्हते, पण नंतर एके दिवशी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एका प्रसिद्ध मीम पेजवर दिसला. त्यानंतर त्याने कंटेंट क्रिएशनला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. ऑस्टिन Moj अॅपवर मजेशीर आणि मनोरंजक व्हिडिओ बनवतो. 

एकदा ऑस्टिनने एका मुलीसोबत व्हिडिओ बनवला, त्यावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. त्याच्या व्हिडिओवर प्रचंड कमेंट्स केल्या, त्यानंतर त्याने अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ बनवणे सुरू केले. ऑस्टिनच्या व्हिडिओमध्ये अनेक मुली दिसतात. त्याला अनेकदा लोक विचारतात की, त्याला इतक्या मैत्रिणी कशा मिळाल्या? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणतो की, माझे कोणाशीही नाते नाही, मी फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवतो.

काही का असेना, पण एक साधा डिलिव्हरी बॉय ते कंटेट क्रिएटरचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. ऑस्टिनला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याच्याकडे चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा फोन नसताना त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. व्हिडिओ शूट करण्यासाठी तो अनेकदा त्याच्या मित्राचा फोन वापरायचा. आता या क्षेत्रात ऑस्टिनचे चांगले नाव झाले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInstagramइन्स्टाग्रामInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स