मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे कितीही दावे करत असल्या, तरी परिस्थिती किती भयानक आहे, याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. एका खासगी बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तिच्या आईच्या आजारपणात सुट्टी हवी होती, त्यावर तिच्या बॉसने जे उत्तर दिले ते ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचे रक्त सळसळेल. या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून 'टॉक्सिक वर्क कल्चर'वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काय आहे हे संतापजनक प्रकरण?
'Reddit' या सोशल प्लॅटफॉर्मवर एका महिला कर्मचाऱ्याने तिचा भयानक अनुभव शेअर केला आहे. संबंधित महिला एका नामांकित खासगी बँकेत कार्यरत होती. अचानक तिच्या आईची प्रकृती खालावली. औषधांच्या रिॲक्शनमुळे आईची अवस्था गंभीर झाली होती आणि त्यांना २४ तास कोणाच्या तरी आधाराची गरज होती. अशा कठीण प्रसंगी त्या महिलेने आपल्या मॅनेजरकडे काही दिवसांच्या सुट्टीची विनंती केली. मात्र, समोरून जे उत्तर आले, त्याने तिला सुन्न केले.
"आईला शेल्टर होममध्ये सोडा"
त्या मॅनेजरने सहानुभूती दाखवण्याऐवजी कामाचा रेटा लावला. "जर आईची प्रकृती ठीक होत नसेल, तर त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात किंवा शेल्टर होममध्ये सोडा आणि ऑफिसला या," असा निष्ठुर सल्ला या बॉसने दिला. ज्या कंपनीसाठी या कर्मचाऱ्याने आपले रक्त-आटवले, त्याच संस्थेने तिला माणसाऐवजी केवळ एक मशिन समजल्याने तिला मोठा धक्का बसला.
शेवटी राजीनामाच दिला!
आपल्या आजारी आईला वाऱ्यावर सोडून कामावर जाणे त्या महिलेला शक्य नव्हते. करिअर की आई? या वादात तिने आईची निवड केली. ऑफिसने सुट्टी नाकारल्यामुळे आणि अशा अपमानस्पद वागणुकीमुळे त्या महिलेने शेवटी कामावर जाणे बंद केले आणि राजीनामा दिला. आपली नोकरी गेली तरी चालेल, पण आईची साथ सोडणार नाही, असा बाणा तिने दाखवून दिला.
Manager told: Put your mother in a medical or shelter home and come to office.u/Mr_Moulick inIndianWorkplace
सोशल मीडियावर संतापाची लाट
ही पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सनी या बँकेवर आणि संबंधित मॅनेजरवर टीकेची झोड उठवली आहे. "अशा लोकांमुळेच कॉर्पोरेट जगतातील माणुसकी संपत चालली आहे," अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी संबंधित बँकेचे नाव जाहीर करण्याची मागणी केली असून, अशा 'टॉक्सिक' बॉसवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे.
Web Summary : Bank employee's boss suggested putting her sick mother in a shelter home. The employee resigned. The incident sparked outrage online, highlighting toxic work culture. Netizens are demanding action.
Web Summary : बैंक कर्मचारी के बॉस ने बीमार माँ को आश्रय गृह में रखने का सुझाव दिया। कर्मचारी ने इस्तीफा दे दिया। इस घटना से ऑनलाइन आक्रोश फैल गया, जो जहरीली कार्य संस्कृति को उजागर करता है। नेटिज़न्स कार्रवाई की मांग कर रहे हैं।