शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जॉब नाही म्हणून बाईकवर विकतोय इडली सांबर; 'बी.कॉम इडली वाला'ची कहाणी ऐकून लोक भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:01 IST

'बी.कॉम इडली वाला' हा तरूण अनेकांना प्रेरणा देत आहे.

Motivational Story । नवी दिल्ली : जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संकटांचा डोंगर तुटून पडतो तेव्हा अनेक जण खचून जातात. अनेकांना जीवनाचा कंटाळा येतो, मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील तरूणाने अशा लोकांना प्रेरणा दिली आहे. आयुष्यात हार न मानायला शिकवणारी ही व्हिडीओ आता चर्चेचा विषय बनली आहे. फरिदाबादच्या रस्त्यांवर मोटारसायकलवरून इडली सांबर विकणाऱ्या अविनाशची स्टोरी लोकांना भावूक करत आहे. ज्या लोकांनी अविनाशचे हे कष्ट जाणून घेतले ते सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. 

कंपन्यांमध्येही केले आहे काम अविनाशची ही प्रेरणादायी स्टोरी swagsedoctorofficial या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले की, फरिदाबादमध्ये रस्त्याच्या कडेला स्वादिष्ट इडली सांबर विकणाऱ्या अविनाशला भेटा. तो पेशाने बी. कॉम उत्तीर्ण आहे, त्याने अनेक राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये टीम मेंबर म्हणून काम केले आहे. तसेच त्याने मॅकडोनाल्डमध्येही सेवा दिली आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो मोठ्या मेहनतीने इडली विकण्याचा व्यवसाय करतो. अविनाशच्या स्टॉलला भेट देऊन त्याची मदत करा.

अविनाशने व्हिडीओमध्ये सांगितले की, त्याने 2019 मध्ये बी.कॉम ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले होते, ज्याच्यानंतर 3 वर्षांपर्यंत मॅकडोनाल्डमध्ये काम केले. तिथूनच त्याला फूड बिझनेसची कल्पना सुचली. पण कधी मोटारसायकलवरून इडली सांबर विकायला सुरुवात करेल असे त्याला वाटले नव्हते. मागील 3 महिन्यांपासून त्याच्याकडे कोणतीही नोकरी किंवा जास्त पैसे कमावण्याचे साधन नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने मोटारसायकलवरून इडली सांबर विकण्यास सुरुवात केली. 

सांभाळतोय कुटुंबाची जबाबदारीज्या मोटारसायकलवर तो स्टॉल उभारून इ़डली सांबर विकतो, ती मोटारसायकल त्याच्या वडिलांनी त्याला बारावी उत्तीर्ण झाल्यावर दिली होती. खरं तर अविनाशच्या वडिलांचा मागील वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अविनाशवर पडली. त्याची पत्नी दक्षिण भारतीय असून ती चांगले दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्यात माहिर असल्याचे तो सांगतो. त्यामुळे त्याने इडली सांबर विकायला सुरुवात केली. त्यांना दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. अविनाशसोबत त्याची आई आणि लहान भावंडेही राहतात.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलbusinessव्यवसायbikeबाईकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी