त्रिवार सलाम! दर महिन्याला पगारातून १० हजार वाचवून गोरगरिबांना अन्न पुरवतोय 'खाकीतील देवमाणूस'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 08:16 PM2020-12-21T20:16:50+5:302020-12-21T20:26:24+5:30

Trending Viral News in Marathi : या पोलिसाचे नाव के. के कृष्ण मुर्ती असं आहे. दर महिन्याच्या पगारातून १० हजार बाजूला काढून कृष्णमुर्ती हे गोरगरिब, गरजूंना अन्नाचे वाटप करतात. 

Andhra pradesh constable spends rupees 10000 every month to help needy and poor people from his salary | त्रिवार सलाम! दर महिन्याला पगारातून १० हजार वाचवून गोरगरिबांना अन्न पुरवतोय 'खाकीतील देवमाणूस'

त्रिवार सलाम! दर महिन्याला पगारातून १० हजार वाचवून गोरगरिबांना अन्न पुरवतोय 'खाकीतील देवमाणूस'

googlenewsNext

(Image Credit- New Indian Express) 

माणसं पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असायला हवीत असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कोरोनाकाळात कर्तव्यावर हजर असलेल्या खाकी वर्दीतील देवमाणसांनी वेळोवेळी आपल्या मनाची श्रीमंती आणि सामाजिक जाणिव दाखवून दिली. सध्या सोशल मीडियावर अश्याच एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल होत आहे.आंध्रप्रदेशात वास्तव्यास असलेल्या या पोलिसाचे नाव के. के कृष्ण मुर्ती असं आहे. दर महिन्याच्या पगारातून १० हजार बाजूला काढून कृष्णमुर्ती हे गोरगरिब, गरजूंना अन्नाचे वाटप करतात. 

२०१७ पासून हे काम सुरू आहे.

 २०१७ पासून कृष्णमुर्ती समाजातील गरजूंना कपडे, लत्ते आणि रेशनचे सामान पुरवत आहेत. सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. म्हणून आता ते लोकांना गरम कपडे पुरवण्यासाठी काम करत आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मला माझ्या आजी- आजोबांकडून ही प्रेरणा मिळाली. कारण मी लहानपणी माझ्या आजी-आजोबांना गोरगरिबांची मदत करताना पाहिले आहे. पोलिस विभागात नोकरीसाठी रूजू झाल्यानंतर मी या चांगल्या कामाची सुरूवात केली.''

काय सांगता? आता हाय-फाय झाला बाबा का ढाबा; अन् काऊंटर सांभाळताहेत बाबा

के.के कृष्णमुर्ती याचा पगार ४५ हजार रूपये प्रती महिना आहे. त्यातून १० हजार रुपये बाजूला काढून ते गोरगरिबांना मदत करतात. गेल्या दोन महिन्यात त्यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांना गरम कपडे आणि चादरी वाटण्याचे काम केले आहे. कृष्णमुर्ती यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर कृष्णमुर्ती यांच्या कार्याने लोक प्रभावित  झाले आहेत.

हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

Web Title: Andhra pradesh constable spends rupees 10000 every month to help needy and poor people from his salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.