... अन् कात्री तिसरीकडेच चालली; संतप्त महिलेला रडू कोसळले, पैसेही परत मागितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:25 IST2023-01-21T17:24:04+5:302023-01-21T17:25:31+5:30
३० वर्षीय अँजेलिका अमेरिकेच्या फोनिक्स सिटीची रहिवाशी आहे, सहा महिन्यांपूर्वी एका महिलेला तिने जन्म दिला आहे

... अन् कात्री तिसरीकडेच चालली; संतप्त महिलेला रडू कोसळले, पैसेही परत मागितले
एका महिलेने सलूनमध्ये जाऊन २ हजार रुपयांत आपले केस कापले होते. विशेष म्हणजे ४०० रुपये टीपही सलूनमधील कारागिरास दिले. मात्र, आरशात स्वत:चा चेहरा पाहिल्यानंतर या महिलेला राग अनावर झाला, संतप्त महिलेने हेअर कटिंगनंतरचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अँजेलिका मिलर असं या महिलेचं नाव असून सलूनवाल्याकडे तिने पैसेही परत मागतिले.
३० वर्षीय अँजेलिका अमेरिकेच्या फोनिक्स सिटीची रहिवाशी आहे, सहा महिन्यांपूर्वी एका महिलेला तिने जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर ती आपला लूक चेंज करण्यासाठी सलून पार्लरमध्ये गेली. मात्र, कटींग केल्यानंतर स्वत:चा बदललेला लूक पाहून ती चांगलीच संतापली. मी हेअर कटींगसाठी २ हजार रुपये दिल होते, त्यानंतर ४०० रुपये टीपही दिली. पण, कटींग झाल्यानंतर माझा चेहरा पाहून मला रडू कोसळलं. मला संतापजनक पश्चाताप झाल्याचं वाटलं, असे अँजेलिनाने म्हटले.
अँजेलिनाला कटींग करत असतानाच मधे-मध्ये तसे जाणवले होते. मात्र, कटींग करणारा कारागिर थांबलाच नाही, याउलट बरोबर करण्याच्या नादात तो केस कापतच गेला आणि शेवटी कटींगचा रिझल्ट असा भयावह आला. अँजेलिनाने या घटनेचा व्हिडिओ टीकटॉकवर टाकला असून मला माझे पैसे परत पाहिजेत, मला रडू येतंय, असे तिने म्हटले आहे. दरम्यान, वादानंतर कटींग सलून चालकाने अँजेलिनाला १६०० रुपये परत दिले आहेत. मात्र, आपण एकूण २४०० रुपये सलूनचालकास दिले होते, असे अँजेलिनाने म्हटले आहे.