Anand Mahindra: दादा, भाईंना स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही पुरविणारे आनंद महिंद्रा कोणाला घाबरू शकतात का? पण केली शहर सोडण्याची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:10 IST2022-02-14T15:08:13+5:302022-02-14T15:10:40+5:30
Anand Mahindra fear: गावा गावातल्या दादा भाईंना रुबाबात मिरवण्यासाठी स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही सारख्या दणकट गाड्या पुरविणारे आनंद महिंद्रा कोणाला घाबरत असतील असे वाटत नाही.

Anand Mahindra: दादा, भाईंना स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही पुरविणारे आनंद महिंद्रा कोणाला घाबरू शकतात का? पण केली शहर सोडण्याची भाषा
गावा गावातल्या दादा भाईंना रुबाबात मिरवण्यासाठी स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही सारख्या दणकट गाड्या पुरविणारे आनंद महिंद्रा कोणाला घाबरत असतील असे वाटत नाही. पण त्यांनी एका अभिनेता शुटिंगवेळी महिंद्रा ट्रकवरून चिडला आणि महिंद्रांनी शहरच सोडण्याची भाषा केली. याबाबत या अभिनेत्याचा व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या बस आणि ट्रकच्या जाहिरातीचे शुटिंग सुरु होते. यावेळी बॉलिवूड अभिनेता अजय देवगन चिडला होता. सारखी सारखी स्क्रिप्ट बदलली जात असल्याने अजय देवगन नाराज झाला होता. या व्हिडीओत देवगनने चिडून विचारले आणि नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे. सारखी सारखी स्क्रिप्ट का बदलत आहात? असा सवाल अजयने विचारला. यावर त्याला सर सारखी सारखी नाही, केवळ चारवेळा असे उत्तर आले. यावर त्याने नाराजी व्यक्त करत खाली पाहिले.
I was informed that @ajaydevgn lost his cool on a @MahindraTrukBus film shoot. I better leave town before he comes after me in one our trucks… pic.twitter.com/roXY7hIfRN
— anand mahindra (@anandmahindra) February 14, 2022
आनंद महिंद्रांना याबाबत जेव्हा कळले तेव्हा त्यांनी शहरच सोडण्याची भाषा केली. मला सांगितले गेले की महिंद्रा ट्रक आणि बसच्या फिल्म शूटवेळी अजय देवगनला राग आला. तो कोणता ट्रक घेऊन येण्याआधीच मी शहर सोडलेले चांगले, असे आनंद महिंद्रा म्हणाले. या ट्विटवर एकाने तर तुम्ही नीट पाहिले नाही, अजय देवगन एक नाही दोन दोन ट्रक घेऊन येतोय, अशी आठवण करून दिली.
अजय देवगण महिंद्रा ट्रक आणि बसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका जाहिरातीमध्ये तो त्याच्या आयकॉनिक स्टंटची पुनरावृत्ती करताना दिसला होता. अजय देवगणने त्याच्या सुरुवातीच्या काळात एका चित्रपटात दोन चालत्या बाईकवर प्रत्येकी एक पाय ठेवण्याचा स्टंट केला होता. नंतर काही प्रसंगी तो हा स्टंट रिपीट करतानाही दिसला आहे. महिंद्राच्या Furio7 ट्रकच्या जाहिरातीतही हाच स्टंट दाखविण्यात आला आहे.