खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 10:39 IST2020-12-16T10:38:44+5:302020-12-16T10:39:58+5:30
Anand Mahindra tweet: लोक विचारात पडले आहेत, हे असे कसे होऊ शकते. डोळे धोका देऊ लागले की डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील...
महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो शेअर केला आहे. सुरुवातीला हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की यातील रेषा या तिरप्या, वाकड्यातिकड्या आहेत. मात्र, जेव्हा तुम्ही एकेक करून प्रत्येक रेषा पहाल तेव्हा तुम्हाला समजेल की या रेषा तिरप्या नसून सरळ आहेत. ही गोष्ट लोकांना हैरान करत आहे.
लोक विचारात पडले आहेत, हे असे कसे होऊ शकते. डोळे धोका देऊ लागले की डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, मी या ऑप्टिकल इल्यूजनच्या मागचे विज्ञान समजू शकत नाहीय. मात्र, निश्चितच हे काम करतेय. जेव्हा तुम्ही एकाबाजुने पाहण्यास सुरुवात करता आणि दुसऱ्या बाजुकडे नजर फिरवता. सायन्सपेक्षा हे नैतिकदृष्ट्या प्रासंगिक आहे. तुमच्या डोळ्यावरील ती लेन्स बदला ज्यांने तुम्ही दुसऱ्यांना जज करता, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आतापर्यंत ४ हजार लोकांनी त्यांचे हे पोस्ट लाईक केले आहे.
काहींनी हा हिरव्या रंगाचा खेळ असल्याचे म्हटले आहे. चला तर मग हा हिरव्या रंगाचा खेळ काय आहे ते पाहुया....
I don’t understand the science behind this optical illusion, but it certainly does work...Especially when you start from one side & go through to the other. The moral is more relevant than the science: Change the lens through which you judge others... #MondayMotivationpic.twitter.com/b9syOxUGc1
— anand mahindra (@anandmahindra) December 14, 2020