शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बायकोचा 'एक ईमेल आणि पुन्हा तिच्याशीच केले लग्न', वाचा काय आहे एका लग्नाची पुढची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 11:51 IST

एकदा घटस्फोट घेतल्यावर पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न कोणी करेल का ? असं खरंच झालंय. ऑस्ट्रेलिया मधील एका दाम्पत्याने घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केलंय.

एकदा घटस्फोट घेतल्यावर पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न कोणी करेल का ? असं खरंच झालंय. ऑस्ट्रेलिया मधील एका दाम्पत्याने घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केलंय. ही अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या दाम्पत्याचे २००४ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर ११ वर्षांनी २०१५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मग असे काय झाले की त्यांनी २०१९ मध्ये परत एकमेकांशी लग्न केले तर ऐकून आश्चर्य वाटेल. ही खरी गोष्ट आहे डॅनियल कर्टिस आणि टिम कर्टिसची जे फक्त एका ईमेल मुळे पुन्हा एकमेकांसोबत आले आणि त्यांनी लग्न केले

काय आहे नेमके प्रकरण

डॅनियल आणि टिम ने २०१५ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर २ वर्ष एकमेकांसोबत काहीच संपर्क ठेवला नाही. २०१७ मध्ये डॅनियल ने टीम ला एक ईमेल पाठवला. मुलाचे पालनपोषण करण्यात तु खूप मदत केली असे म्हणत नवऱ्याचे कौतुक तिने त्या ईमेल मध्ये केले होते. यानंतर दोघांचेही आयुष्यच बदलले. दोघेही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१९ मध्ये त्यांनी परत एकदा लग्न केले.

डॅनियल ने सांगितले, '२००२ मध्ये मी ऑनलाईन डेटिंग साईटवर टिम ला भेटले. ९ एप्रिल २००३ मध्ये त्याने मला लग्नाची मागणी घातली. जानेवारी २००४ मध्ये आम्ही लग्न केले. १८ महिन्यांतर आम्ही मुलाला दत्तक घेतले.'

२०१२ मध्ये आलेल्या आर्थिक संकटाचा फटका या दोघांनाही पडला. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा संपर्क तुटला. २०१५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. डॅनियल म्हणते, ' २०१७ मध्ये एका काऊंसिलर च्या सांगण्यावरुन माझ्या हे लक्षात आले की सुखी जीवन जगण्यासाठी टीम आणि स्वत:ला माफ करणे गरजेचे आहे. म्हणून मी टीम ला मेल पाठवला. माझा मेल बघून तोही आश्चर्यचकित झाला. त्याने रिप्लाय दिला आपण भेटून यावर चर्चा केली पाहिजे.'

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट