शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या ऑटोवाल्या आजोबांची फर्राटेदार इंग्लिश... अ‍ॅसेंट पाहून तोंडात बोटे घालाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:09 IST

सोशल मीडिया म्हणजे माहितीचं भांडार आहे.

Social Viral :सोशल मीडिया म्हणजे माहितीचं भांडार आहे. जगाच्या पाठीवर कुठं काय घडतंय याची पुरेपूर माहिती येथे सहज उपलब्ध होते. सध्या इंटरनेटवर महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका वयस्क रिक्षाचालकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षावाले आजोबा  इंग्रजी भाषेत समोरील व्यक्तीसोबत संवाद साधताना दिसत आहेत. ऑटो चालक आजोबा दोन तरुणांना इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतात. 

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून या रिक्षाचालक व्यक्तीचे नेटकरी तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालक आजोबा इतरांना इंग्रजी भाषा शिकण्याचा सल्ला देत आहेत. वेगवेगळी उदाहरणे देत ते या तरुणांना इंग्रजीचं महत्व समजावत आहेत. शिवाय  तुम्हाला जर इंग्रजी भाषेतून संवाद साधत येत असेल तर तुम्ही लंडन, अमेरिका तसेच पॅरिस यांसारख्या देशांमध्ये फिरु शकता, असं त्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सवर या रिक्षाचालक काकांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. त्यात हे काका अगदी सहजतेने  आपल्या प्रवाशासोबत इंग्रजीत बोलत आहेत. त्याचबरोबर त्यांचा इंग्लिश अ‍ॅसेंट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रिक्षाचालक आजोबा म्हणतात,"मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जर इंग्रजी भाषेतून संवाद साधता येत असेल तर तुम्ही लंडन, अमेरिका तसेच पॅरिस यांसारख्या देशांमध्ये फिरु शकता. तुम्हाला इंग्रजी येत नसेल  तर परदेशात जाता येणार नाही. लंडनमधील कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे इंग्रजी ऐवजी तुम्ही मराठीत बोलू लागलात तर तेथील वेटर तुम्हाला बाहेर हाकलून देईल. यासाठीच मी तुम्हाला सांगतोय  इंग्रजीत बोलायला शिका कारण ती आपली आंतरराष्ट्रीय भाषा आहे". 

हा व्हिडिओ नेटकऱ्यांचा चांगलाच पसंतीस उतरला आहे. शिवाय सोशल मीडिया यूजर्सनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAmravatiअमरावती