चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे निराश झाली, आता फळफळलं नशीब; जिंकली १७ कोटींचा जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:36 IST2025-02-21T16:35:18+5:302025-02-21T16:36:32+5:30

चुकीचं लॉटरी तिकीट मिळाल्याने केली लिंडसे सुरुवातीला नाराज झाली. नंतर त्याने पार्किंग क्षेत्रात तिकीट स्क्रॅच करण्याचा निर्णय घेतला. 

america virginia woman won whopping 17 crore jackpot prize with wrong lottery ticket | चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे निराश झाली, आता फळफळलं नशीब; जिंकली १७ कोटींचा जॅकपॉट

चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे निराश झाली, आता फळफळलं नशीब; जिंकली १७ कोटींचा जॅकपॉट

जगात कधी, कसं आणि कोणाचं नशीब बदलेल हे कोणालाही माहिती नाही. कधीकधी खूप प्रयत्न करुनही मनासारखं होत नाही, तर कधीकधी एका चुकीमुळे जॅकपॉट मिळतो. व्हर्जिनियातील एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं, ज्यामुळे त्या महिलेचं नशीब बदललं आहे. व्हर्जिनियातील एका महिलेला चुकीचं लॉटरीचं तिकीट मिळाल्याने ती नाराज झाली होती, पण त्याच चुकीच्या लॉटरीच्या तिकिटामुळे तिला २ मिलियन डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये तब्बल १७ कोटी ३२ लाख रुपये) चा जॅकपॉट मिळाला.

फॉक्स बिझनेसच्या वृत्तानुसार, कॅरोलटन येथील रहिवासी केली लिंडसेने स्थानिक दुकानातून खास स्क्रॅच-ऑफ तिकीट मागितलं होतं, परंतु कॅशियरने चुकून महिलेला मनी ब्लिट्झचे स्क्रॅच-ऑफ तिकीट दिलं. चुकीचं लॉटरी तिकीट मिळाल्याने केली लिंडसे सुरुवातीला नाराज झाली. नंतर त्याने पार्किंग क्षेत्रात तिकीट स्क्रॅच करण्याचा निर्णय घेतला. 

तिकीट स्क्रॅच केल्यानंतर जे घडलं ते पाहून केलीला धक्का बसला. केलीने २ मिलियन डॉलरचं जॅकपॉट बक्षीस जिंकलं होतं, जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १७,३२,८३,१०० रुपये आहे. या घटनेबद्दल केलीने गमतीने म्हटलं की, मी यावर खूश नव्हतो. ही लॉटरी तिकिटातील चूक केली लिंडसेच्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान चूक ठरली.

लॉटरी जिंकल्यानंतर, केलीने जिंकलेले पैसे एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला आणि सर्व कर भरल्यानंतर, केलीला १२५०००० डॉलर मिळाले. द मेट्रोच्या मते, मनी ब्लिट्झ गेममध्ये जॅकपॉट जिंकण्याची शक्यता ११,४२,४०० पैकी एक आहे. या गेममध्ये एकूण दोन टॉप बक्षिसं आहेत, म्हणजेच याचा दुसरा भाग्यवान विजेता अद्याप जाहीर झालेला नाही.

Web Title: america virginia woman won whopping 17 crore jackpot prize with wrong lottery ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.