मैं झुकेगा नहीं! एक, दोन नव्हे १० बैलांवर भारी पडलं एकटं बदक; आनंद महिंद्रा म्हणाले प्रेरणादायी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:37 IST2022-02-22T16:34:11+5:302022-02-22T16:37:59+5:30
एकटं बदक शक्तीशाली बैलांवर भारी; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

मैं झुकेगा नहीं! एक, दोन नव्हे १० बैलांवर भारी पडलं एकटं बदक; आनंद महिंद्रा म्हणाले प्रेरणादायी!
उद्योगपती आनंद महिंद्रा दररोज ट्विटरवर व्हिडीओ शेअर करतात. महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असतात. महिंद्रा शेअर करत असलेल्या व्हिडीओमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. तर काहीवेळा त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे मनोरंजनदेखील होतं. आता आनंद महिंद्रा यांनी एका बदकाचा आणि गाय बैलांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
एका मैदानाच्या मध्यभागी असलेलं बदक त्याच्यापेक्षा आकारानं कैकपट असलेल्या गाय, बैलांना थेट भिडतं. बैल सातत्यानं बदकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र बदकानं तिथून पळून जाण्याऐवजी त्यांना भिडण्याचा निर्णय घेतला. चोचीच्या मदतीनं त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लहानशा बदकाचा आक्रमक पवित्रा पाहून बैलदेखील मागे हटले. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
‘How’s the Josh, bird?’ ‘High sir, Ultra high’. That bird’s chutzpah is my #MondayMotivation (courtesy @ErikSolheim ) pic.twitter.com/lVDRXpDZbp
— anand mahindra (@anandmahindra) February 21, 2022
हाऊ इज द जोश बर्ड? हाय सर, अल्ट्रा हाय असं आनंद महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करताना ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा बदकामुळे प्रेरणा मिळाल्याचं महिंद्रा ट्विटमध्ये म्हणतात. ग्रीन बेल्ट अँड रोड इन्स्टिट्यूटचे प्रमुख एरिक सोलहेम यांच्या सौजन्यानं त्यांनी हा ट्विट केला आहे. अवघ्या ८ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.