भूत चहा अन् कंकाल बिस्किट, अहमदाबादच्या स्मशानभूमीतील भयानक चहाचा स्टॉल चर्चेत;  'Video' व्हायरल    

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:40 PM2023-12-28T12:40:07+5:302023-12-28T12:42:20+5:30

सध्या सोशल मीडियावर अहमदाबादमधील एका स्मशानभूमीतील चहाच्या स्टॉलची जोरदार चर्चा रंगतेय. 

Ahmedabad bbhayanak tea stall intrsting menu goes viral here you get chudail  chaha and bhoot coffee video viral on social media  | भूत चहा अन् कंकाल बिस्किट, अहमदाबादच्या स्मशानभूमीतील भयानक चहाचा स्टॉल चर्चेत;  'Video' व्हायरल    

भूत चहा अन् कंकाल बिस्किट, अहमदाबादच्या स्मशानभूमीतील भयानक चहाचा स्टॉल चर्चेत;  'Video' व्हायरल    

Viral Video : चहा हे प्रत्येकाच्या आवडीच पेय आहे. क्षणार्धात शरीराचा थकवा दूर करण्याची ताकद चहामध्ये असते. आपल्यापैकी अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. पण सध्या अहमदाबादच्या चहा स्टॉलवर विशिष्ट चहाच्या मेन्यूची तुफान चर्चा होतेय.

अहमदाबाद शहरातील एका चहा स्टॉलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्माशानभूमीच्या बाजूला एका व्यक्तीने आपला चहाचा स्टॉल उभारला आहे. बरं, इतकंच नाही तर त्याने या चहा स्टॉलला भयानक नाव देखील दिलं आहे. या स्टॉलच्या मालकाने 'भयानक टी स्टॉल' असे नाव या चहा स्टॉलला दिलं आहे.अहमदाबादमधील सरदारनगरमध्ये एका स्मानाशात हा चहा कॉफीचा स्टॉल आहे.

या चहाच्या स्टॉलवर अदरक, इलायची चहाच्या व्यतिरिक्त चुडैल चहा, डायन चहा, भूत कॉफी, मुर्दा चहा, प्रेत आत्मा चहा, तांत्रिक चहा, अस्थी चहा, कब्रस्तान चहा असा चहाचा मेनू आहे. सोबतच चहाप्रेमींसाठी कंकाल बिस्किट सुद्धा या स्टॉलवर उपलब्ध आहे. या भयानक चहा स्टॉलचा भयानक मेन्यू वाचून अंगावर शहाराच येईल. विशेष म्हणजे या चहाचा स्टॉल एका स्मशानभूमीमध्ये असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे.

हॉरर थीम आधारित असलेल्या चहा स्टॉलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद  दिला आहे. बजरंगी असं या चहा स्टॉलच्या मालकाचं नाव आहे. शिवाय चहाप्रेमींची रोज या स्टॉलवर मोठी गर्दी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Ahmedabad bbhayanak tea stall intrsting menu goes viral here you get chudail  chaha and bhoot coffee video viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.