शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलेला I LIKE YOU मेसेज पाठवणं पडलं महागात; पतीने केली बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:41 IST

अनोळखी महिलेला I LIKE YOU असा मेसेज करणं एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलं आहे.

नवी दिल्ली : एका ट्विटर युजरने पंजाबपोलिसांकडे एक तक्रार केली होती, ज्या तक्रारीला उत्तर दिल्यानं पंजाबपोलिसांचे विशेष कौतुक देखील केले जात आहे. झालं अस की ट्विटर युजरने एका अनोळखी महिलेला  I LIKE YOU असा मेसेज पाठवला, ज्यामुळे महिलेच्या पतीने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित व्यक्तीने पोलिसात धाव घेतली आणि मदत मागितली. त्याने केलेले ट्विट आता डिलीट करण्यात आलं आहे मात्र याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

महिलेच्या पतीने केली बेदम मारहाण

पोलिसांना केलेल्या ट्विटमध्ये तक्रारदार ट्विटर युजर सुशांत दत्त म्हणाला, "सर मी अनोळखी महिलेला 'आय लाईक यू'चा मेसेज पाठवला, त्यानंतर मी माफी मागून देखील काल रात्री तिच्या पतीने मला बेदम मारहाण केली. मात्र आता मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. कृपया माझी मदत करा आणि माझ्या मला सुरक्षा द्या, आज पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला होऊ शकतो."

पंजाब पोलिसांनी दिले उत्तर

ट्विटरच्या बायोनुसार भाष्य करायचे झाले तर सुशांत दत्त माहिती अधिकारचा (RTI) कार्यकर्ता आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, "तुम्ही एका अनोळखी महिलेला असा मेसेज पाठवल्यानंतर कोणती अपेक्षा करत होता याची कल्पना नाही. मात्र त्यांनी तुम्हाला मारहाण करायला नको होती. त्यांनी आम्हाला कळवायला हवं होतं आम्ही कायद्यानुसार योग्य ती सेवा केली असती. या दोन्ही गुन्ह्यांची कायद्यानुसार योग्य ती दखल घेतली जाईल."

दरम्यान, या संपूर्ण घटनेवरून आता पंजाब पोलिसांचे विशेष कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी सुशांत दत्तला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्यास सांगितले. या संपूर्ण घटनेतील पंजाब पोलिसांच्या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहेत. तसेच 'समस्येतून मार्ग काढणे' हेच पोलिसांचे काम असल्याचं सोशल मीडियावरील युजर्स बोलत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPunjabपंजाबPoliceपोलिसTwitterट्विटरWomenमहिला