शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: फिल्मी स्टाईलने बिडी पेटवली अन् काडी फेकली; क्षणात बाईक, दुकाने झाली खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 20:50 IST

आंध्र प्रदेशात एका माचिसच्या पेटत्या काडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Andhra Fire : धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असण्यासोबत त्याच्या सेवनावेळी निष्काळजीपणे असे करणे अधिक धोकादायक आणि घातक ठरू शकते. याचाच प्रत्यय आंध्र प्रदेशात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चहा किंवा पानाच्या दुकानात लोक अनेकदा बिडी आणि सिगारेट ओढताना दिसतात. या व्हिडीओमध्येही असेच काहीसे घडले. पण बिडी पेटवल्यानंतर एका माचिसच्या काडीने दोन बाईकसह अनेक दुकानांचा कोळसा केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील कल्याणदुर्गम शहरात सकाळच्या सुमारास घडली. एका व्यक्तीने धुम्रपान करताना अनेक दुकानं आगीत जाळून खाक करुन टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र लोकांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लोक दुकानाजवळ उभे राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तिथे एक स्कूटर आणि एक बाईकही उभी केलेली दिसते. दोघेजण आरामात उभे राहून गप्पा मारण्यात व्यस्त होते. मात्र काही सेकंदात तिथलं दृश्य बदललं. बोलत असतानाच एका व्यक्तीने धूम्रपान करण्यासाठी विडी काढली. त्यानंतर विडी पेटवल्यानंतर त्याने माचीसची काडी ओल्या जमिनीवर फेकली. पण ही जमीन पाण्यामुळे नाही तर पेट्रोलमुळे ओली झाली होती. हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही.

माचिसची जळणारी काडी जमिनीवर पडताच तिथे मोठी आग लागली आणि आग लगेचच दोन्ही बाईक आणि दुकानापर्यंत पोहोचली. आगीनंतर लोक घटनास्थळावरून पळायला लागले. बघता बघता आगीत काही दुकानेही खाक झाली. एका व्यक्तीने पाच लिटर पेट्रोल विकत घेतलं होते. पण तो दुचाकीवरून जात असताना कंटेनरमधून त्याची रस्त्यावर गळती झाली. रस्त्यावर अनेक दुकानं असणाऱ्या ठिकाणीच ही गळती झाली होती. तिथेच बिडी पिणाऱ्या व्यक्तीने माचिसची काडी फेकली.

दरम्यान, स्थानिक लोकांनी शहाणपणा दाखवत हे प्रकरण तातडीने हाताळण्याचा प्रयत्न केला. जीवित वा वित्तहानी होण्याआधीच लोक पाणी, वाळू घेऊन धावू लागले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघातfireआगSocial Viralसोशल व्हायरल