शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

African baba ramdev : कमाल! आफ्रिकेच्या रामदेव बाबांचा खतरनाक स्टंट पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 19:44 IST

African baba ramdev video goes viral : आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच आफ्रिकेचा बाबा रामदेव, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर  योगाचे जबरदस्त स्टंट करत असलेल्या एका आफ्रिकन माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा माणसाला पाहताच सोशल मीडियार युजर्सना भारतातील योगगुरु बाबा रामदेव यांची आठवण झाली आहे. रामदेव बाबा आपली जीवनशैली, योगा आणि फिटनेस यांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहेत. अशातच त्याच्याप्रमाणेच लवचिक शरीर असलेल्या एका आफ्रिकेच्या तरूणानं सोशल मीडियावर  धुमाकूळ घातला आहे. 

हा व्हिडीओ एकदा पाहायला सुरूवात केल्यानंतर बघणाऱ्याची नजर हटत नाही.  व्हिडीओतला माणुस सर्वात आधी तो आपला उजवा पाय उचलतो. त्यानंतर तो त्या उजव्या पायाची सहज घडी करतो. त्या घडी केलेल्या पायाला वेगवेगळ्या दिशेने फिरवतो. त्यानंतर तो हातांची कसरत सुरु करतो. पाठीमागे हातांची घडी करुन दाखवतो. नंतर तो एका हाताने पाठ खाजवण्याचा प्रयत्न करतो. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

हा माणूस एवढ्यावरच थांबत नाही तर त्यानंतर तो पोट मागे घेतो. हे पोट तो इतकं मागे घेतो की त्याच्या छातीच्या बरगड्या दिसायला लागतात. त्यानंतर तो हात आणि पायांची एकत्र कसरत करतो. नंतर तो खाली बसून पायाने डोक्यावरची टोपी काढतो. टोपीने तोंडाला हवा मारतो. त्यानंतर पायानेच ती टोपी डोक्यावर ठेवतो. यावेळी तो जणू काही योगासनेच करतोय, असं वाटतं. 

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी तरुणाच्या लवचिकतेचं कौतुक केलं आहे. तसेच आफ्रिकेचा बाबा रामदेव, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेYogaयोग