शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: शुटिंगदरम्यान अभिनेत्रीला चावला साप, सर्पदंशाचा ती घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 18:24 IST

विविध प्राण्यांना घेऊन शूटिंग करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियात आहे. मात्र प्राण्यांसोबत शूटिंग करताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर ही बाब कशा प्रकारे जीवावर बेतू शकते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.

शूटिंग (shooting) सुरू असताना अचानक सापाने (snake) अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दंश (bite on face)  केल्याचा व्हिडिओ सध्या (video viral) सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. सापाला घेऊन एक गाणं शूट करण्याची तयारी ही अभिनेत्री करत होती. या दरम्यान अचानक सापाने दंश केला आणि अभिनेत्रीला धक्का बसला. विविध प्राण्यांना घेऊन शूटिंग करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियात आहे. मात्र प्राण्यांसोबत शूटिंग करताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर ही बाब कशा प्रकारे जीवावर बेतू शकते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. 

अमेरिकेतील २१ वर्षांची गायिका माएटा एक व्हिडिओ शूट करत होती. व्हिडिओत ब्लॅक लेस बॉडीसूट घातलेली माएटा एका पांढऱ्या बॅकड्रॉपवर झोपल्याचं दिसतं. एक सहकारी तिच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा साप आणून ठेवतो, तर एक काळा साप अगोदरपासूनच तिच्या अंगावर ठेवण्यात आलेला असतो. पांढरा साप अंगावर सोडल्यानंतर काळा साप अचानक आक्रमक होतो आणि अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा चावा घेतो. हे घडताच अभिनेत्री झटक्यानिशी साप अंगावरून बाजूला करते आणि उठते. 

व्हिडिओ शूट करताना साप आपल्याला चावेल, याची कधी कल्पनाही केली नसल्याचं माएटानं म्हटलं आहे. हा आपल्यासाठी एक भयंकर अनुभव होता आणि या घटनेनंतर आपल्या मनात प्रचंड भीती निर्माण झाल्याचं तिनं म्हटलं आहे. अनेकांना सापाचं नाव काढलं तरी भिती वाटते. दूरवर जरी साप दिसला तरी लोक तिथून पळून जातात. मात्र माएटानं साप अंगावर ठेऊन त्यांच्यासोबत व्हिडिओ शूटिंग  करण्याची मानसिक तयारी केली होती. त्यासाठीच्या शूटिंगलादेखील सुरुवात झाली होती. मात्र शूटिंग सुरू असतानाच सापानं चावा घेतल्यामुळं शूटिंग थांबवण्यात आलं. 

हा साप बिनविषारी असल्यामुळे माएटाच्या जिवाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही. जुजबी उपचारांनंतर तिला घरी सोडण्यात आलं. मात्र शारीरिक इजा झाली नसली, तरी सापाने थेट चेहऱ्याचा चावा घेतल्यामुळे माएटाला जबर मानसिक धक्का बसला.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम