शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

डिलिव्हरी बॉयचं बिंग फुटलं! पार्सल पोहचवायला गेला अन्...; 'CCTV' फुटेजने केलं पितळ उघडं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:23 IST

सोशल मीडियावर स्विगी इन्स्टामार्ट डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये तो चक्क शूज चोरताना दिसतोय.

Social Viral : सोशल मीडियावर कायमच नेटकऱ्यांना नवनवीन कटेंट पाहायला मिळत असतो. करमणूक, शिक्षण तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खुराक पुरवणारे  व्हिडिओ किंवा रिल्स या माध्यमातून आपल्या समोर येतात. सध्या इंटरनेटर व्हायरल होणाारा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय. जो पाहून अनेकांचे डोळे उघडतील.

बदलत्या जीवनशैलीनूसार सध्या प्रत्येकाचा कल ऑनलाईन पेमेंटकडे वाढत चाललाय. अगदी बारीक-सारीक गोष्ट जरी असली तरी लोक ऑनलाईन ऑर्डर करण्यास पसंती देतात. अर्थातच हा पर्याय प्रत्येकाला सोयीस्कर असतो.  वाढत्या ऑनलाईन पेमेंट्समुळे सायबर क्राईमसारखे प्रकारही दिवसेंदिवस वाढतायत. ऑनलाईन खरेदी केल्याने काहींना त्याचा फटका बसला तर काहींना नको त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं अशा अनेक घटना आपल्याला ज्ञात असतील. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या समोर आला आहे. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद करण्यात आली.ज्यामुळे डिलिव्हरी बॉयचं पितळ उघडं पडलं.

साधारण ९ एप्रिलच्या दिवशी गुरुग्रामच्या एका सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. फ्लॅटच्या दरवाजातून शूज गुल करणाऱ्या या माणासाची कामगिरी पाहून नेटकरी अवाक् झालेत. रोहित अरोरा नावाच्या एका एक्स यूजरने हा व्हिडिओ शेअर केलाय.

व्हायरल व्हिडिओनूसार, हा डिलिव्हरी बॉय ज्या ठिकाणी ऑर्डर पोहचवायची आहे त्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत जातो. तिथे गेल्यानंतर तो दरवाजाची बेल वाजवतो. जोपर्यंत दरवाजा उघडला जात नाही तोवर तो डिलिव्हरी आजुबाजूला कोण आहे का ते पाहतो. काही वेळानंतर फ्लॅटमध्ये असलेली महिला दरवाजा उघडते आणि आपली ऑर्डर घेते. त्यानंतर पार्सल दिल्यानंतर तो बिल्डिंगचा जिना उतरताना दिसतोय. अचानक आपल्या डोक्याला बांधलेला कपडा काढून तो पुन्हा माघारी फिरतो. ज्या ठिकाणी त्याने पार्सल पोहचवलं तिथे जाऊन तो आपल्या रुमालामध्ये फ्लॅटच्या समोर असलेले काळ्या रंगाचे शूज लपवतो. त्यानंतर तो तिथून पळ काढताना दिसतोय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलtheftचोरीSwiggyस्विगीSocial Mediaसोशल मीडिया