शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण परिस्थिती! कोरडा दुष्काळ, वाटीभर पाण्यासाठी रांगा; अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 13:16 IST

दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे.

देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. राज्यातील ग्रामीण भागातही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ दिल्लीत काय परिस्थिती आहे हे दाखवतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाटीभर पाण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे देशातील बहुतांश भागाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला.

पुण्यासारख्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाणी रस्त्यावर तुंबत असून, शहरातील काही भागांना नदी-नाल्याचे स्वरूप आले. पण, ग्रामीण भागात आजही कोरडा दुष्काळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण-खटाव परिसरातील लोकांसाठी हा संघर्ष नवा नाही. पण, दरवर्षीच्या तुलनेत यावेळी त्यांना यंदा पाण्यासाठी खूपच वणवण फिरावे लागले. येथील अनेक गावांमध्ये चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. 

अंगावर काटा आणणारे दृश्य 

हे सोशल मीडियाचे जग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये लोक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. याशिवाय वाटीभर पाण्यासाठी किती संघर्ष करत आहेत हे व्हिडीओतून स्पष्ट होते. 

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ समुद्राजवळील असल्याचा कळते. वाळूत छोटे-छोटे खड्डे खोदून लोक वाटीभर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एक हंडा अथवा एक भांडे भरायला लागणारा वेळ आणि त्यासाठी असलेली भली मोठी रांग भीषण परिस्थितीचा अंदाज देते. 

पाण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना पाहून नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. कमेंटच्या माध्यमातून लोक यावर व्यक्त होत आहेत. "जल से ही कल है", "जल ही जीवन है" , अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळSocial Viralसोशल व्हायरल