शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मायेची ऊब! घरातून निघाला अन् इन्स्पेक्टर म्हणून परतला; लेकाला वर्दीत पाहून आईला आनंदाअश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 18:01 IST

जगभरातील लाखो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी घर सोडून जातात.

जगभरातील लाखो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी घर सोडून जातात. आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून परक्या शहरात राहणाऱ्या तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक अशी उदाहरणं पाहायला मिळतात, जी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही 'पाखरं' आपल्या घरी परतात. तेव्हा तो क्षण त्यांच्यासह त्यांच्या घरच्यांसाठी अविस्मरनीय असतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, आपल्या मुलाचं यश पाहून त्या माऊलीला अश्रू अनावर होतात. ती मायेनं आपल्या लेकराला मिठी मारते. हा व्हिडीओ अशा एका मुलाचा आहे, जो घरातून मोकळ्या हाताने बाहेर पडला अन् इन्स्पेक्टर म्हणून परततो. आपल्या मुलाला वर्दीत पाहून त्याची आई आनंदाने वेडी झाल्याचे पाहायला मिळते.

 मायेची ऊबसोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला हा १८ सेकंदांचा व्हिडीओ भावुक करणारा आहे. कोणीतरी दार ठोठावल्यावर आई घरातील कामात व्यस्त असल्याचे यात दिसून येते. आईला अजिबात कल्पना नव्हती की आपला मुलगा आला आहे. पण जेव्हा आपला मुलगा समोर दिसतो तेव्हा ती माऊली हळू हळू दरवाजाकडे पाऊलं टाकते. पण वर्दीत असलेला इन्स्पेक्टर मुलगा पाहून आईला रडू कोसळते. 

आईचा आनंद गगनात मावेना आपल्या मुलाला पोलिसांच्या वर्दीत पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने आपले दोन्ही हात मोठ्या आनंदाने लेकाच्या डोक्यावर ठेवले. मुलगा जवळ आल्यावर आईने लगेच त्याला मिठी मारली.  

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीPoliceपोलिस