शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली! अन् शिक्षिकेने शिकवला 'संस्कारा'चा धडा, सर्वत्र होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:42 IST

विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली असता शिक्षिकेने त्याला चांगलाच संस्काराचा धडा शिकवला आहे.

नवी दिल्ली : एका विद्यार्थ्याने मुलीची छेड काढली असता शिक्षिकेने त्याला चांगलाच संस्काराचा धडा शिकवला आहे. खचाखच भरलेल्या वर्गात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला तुला आई बहिण नाही का? हा प्रश्न विचारला तेव्हा सगळेच अवाक् झाले. सध्या या धाडसी शिक्षिकेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका अतिशय शांतपणे मुलाला समजावून सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपले कर्म आपल्याकडे परत येते, असे ती म्हणत आहे. आपण जे करतो ते आपल्या बाबतीत नक्कीच घडते. 

खरं तर वर्ग सुरू झाल्यावर शिक्षिकेची नजर एका विद्यार्थीनीवर पडते. वर्ग खचाखच भरलेला होता, त्यामुळे तिला बसायला कुठेच जागा मिळत नव्हती. ती उभीच होती, शिक्षिकेने तिला बसायला सांगितले तितक्यात एका मुलाने तिला त्याच्याजवळ बसण्यास सांगितले. विद्यार्थ्याचा हेतू शिक्षिकेने ओळखला आणि तिने आपला संयम न गमावता मुलाला समजावून सांगायला सुरुवात केली. शिक्षिकेने मुलाला भरवर्गात विचारले की, "तुझ्या बहिणीला कोणी इथे येऊन बसायला सांगितले तर तुला आवडेल का?". त्यामुळे थोड्या मर्यादेत राहायला हवं ना? अशा शब्दांत शिक्षिकेने संबंधित मुलाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. 

शिक्षिकेचे सर्वत्र होतंय कौतुक  हे सर्व सांगताना शिक्षिकेच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम शांत होते. मनात कोणताही राग न ठेवता तिने फक्त समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळेच हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. याउलट वर्गातील मुलांचे गैरवर्तन पाहून शिक्षकांची अनेकदा चिडचिड होते. ते टोमणे मारतात आणि फटकारतात देखील. हा एक शॉर्टकट आहे. परंतु अनेक शिक्षकांना असे वाटते की त्यांनी मुलाला चांगले काय आणि वाईट काय ते समजावून सांगावे जेणेकरुन मूल स्वत: ठरवू शकेल. मात्र, हे सोशल मीडियाचे युग आहे. कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगणे कठीण आहे. कारण प्रेरणा किंवा वेडेपणा दोन्ही लोकांचे लक्ष वेधून घेतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSocial Mediaसोशल मीडिया