शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इथे माणुसकी संपली! धावत्या कारला बांधून कुत्र्याला नेले फरफटत, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:09 IST

राजस्थानमध्ये एका कुत्र्यासोबत कथितपणे केलेल्या क्रूरतेची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका कुत्र्यासोबत कथितपणे केलेल्या क्रूरतेची घटना समोर आली आहे. कुत्र्याला धावत्या गाडीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कुत्रा देखील नाईलाजास्तव कारच्या मागे धावताना दिसत आहे. यावेळी असहाय्य झालेल्या कुत्र्याला पाहून अनेकांनी कार चालकाविरूद्ध प्रश्न उपस्थित केले आहेत. हा सर्व थरार घडत असताना तेथून जाणाऱ्या काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चालक पेशाने डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे.

चालक डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, ही घटना राजस्थानधील जोधपूर येतील असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यातील डॉक्टराविरूद्ध कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल्याप्रकरणी 18 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 428 प्राण्याला मारणे किंवा इजा पोहचवणे आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम ११ या अंतर्गत डॉ. रजनीश गलवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी जोगेंद्र सिंग यांनी दिली.

कुत्र्याच्या पायाला गंभीर दुखापत खरं तर आरोपी डॉ. रजनीश गलवा यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक दिलीप कछवाहा यांनी म्हटले की, आरोपीला कारणे दाखवा नोटीस पाठवून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांपैकी काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला होता. याशिवाय चालक डॉक्टराला गाडी थांबवण्याचा आग्रह देखील करण्यात आला. दरम्यान, 'डॉग होम फाऊंडेशन'च्या केअरटेकरने सांगितले की, कुत्र्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या पायाला आणि मानेला जखमा आणि किरकोळ दुखापत झाली आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdogकुत्राCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरRajasthanराजस्थान