शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धावपट्टीवर धावत होते विमान, कॉकपिटमध्ये पायलटऐवजी बसले होते मूल, सुरत विमानतळावरील Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:44 IST

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट सीटवर एक लहान मूल बसलेले दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुरत येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये 5 वर्षांच्या मुलाने पायलट सीटवर हेडसेट घातलेला आणि विमानाचे स्टीयरिंग व्हील पकडलेले पाहायला मिळत आहे. खरं तर मुख्य वैमानिक धावपट्टीवर उड्डाणासाठी दिशानिर्देश देत आहे. विमान धावपट्टीवर धावत असून नंतर टेक ऑफ करत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, व्यावसायिक विमानामध्ये कोणत्याही प्रवाशाला अगदी एअर होस्टेसला देखील परवानगीशिवाय कॉकपिटमध्ये प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पायलट सीटवर एक मूल दिसत आहे. अशा परिस्थितीत छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, "चालत्या विमानात पायलटच्या सीटवर बसलेल्या मुलाच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. गुरुवारी एका लहान मुलाचा चालत्या विमानात पायलटच्या सीटवर बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. विमान टेक ऑफ करत असताना सुरत विमानतळावर हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता." माहितीनुसार, कॉकपिटमध्ये बसलेले मूल एका राजकीय कुटुंबातील आहे. तसेच या घटनेबाबत डीजीसीएमध्ये तक्रार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलairplaneविमानpilotवैमानिकAirportविमानतळSuratसूरत