शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Viral: 14 जणांनी 3 बाईकवर स्वार होऊन दिलं मृत्यूला चॅलेंज; प्रचंड वेग पाहून सगळेच अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:55 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. आजच्या धावपळीच्या जगात रस्त्यावर सुरक्षेची खात्री दिली जाऊ शकत नाही. कारण बहुतांश मंडळी संयम सोडून वाहने चालवत असतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खरं तर हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बरेलीचा आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये 3 बाईकवर बसलेले 14 लोक प्रचंड वेगाने स्टंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संतापले आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी केली कारवाई वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बरेलीच्या देवरानिया पीएस परिसरातील आहे. इथे 14 लोक 3 बाईकवर स्वार झाले असून एका गाडीवर 6 आणि दोन गाडीवर 4 जण बसले आहेत. बरेलीचे एसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी म्हटले की, माहिती मिळताच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील कारवाई केली जात आहे. 

नेटकरी संतापले पोलिसांनी कारवाई केली असली तरी सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित करत लिहिले आहे, "हे लोक खरंच मृत्यूला घाबरत नाहीत का?" या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित करताना आणखी एका युजरने या लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशbikeबाईकStuntmanस्टंटमॅनPoliceपोलिस