शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: 100 वर्षांचा 'जवान' उभाही राहू शकत नाही; पण सलाम पाहून तुम्हीही ठोकाल 'सलाम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 19:38 IST

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे. कारण आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल ट्रेनर सुभेदार मेजर गोविंद स्वामी यांचा आहे. मेजर स्वामींना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील 100 वर्षीय माजी सैनिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये माजी लष्करी अधिकाऱ्याची जिद्द पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मेजर स्वामीं यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन मद्रास सॅपर्सने बंगळुरूमध्ये केले होते. या कार्यक्रमात मेजर स्वामी आल्यावर काही अधिकारी मिळून त्यांना कारमधून बाहेर काढतात आणि व्हीलचेअरवरून स्टेजवर आणतात. मेजर स्वामींना व्यवस्थित हालचाल करणे देखील खूप कठीण जात आहे हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी मेजर स्वामी अधिकाऱ्यांना सलाम करत आहेत. हे पाहून स्वामींनी ज्या भावनेने सलाम केला त्या भावनेला सर्वजण 'सलाम' ठोकत आहेत. ही सलामी पाहून आनंद महिंद्राही स्वामी यांचे चाहते झाले आहेत.

आनंद महिंद्रा झाले प्रभावितआनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी आता पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "सब मेजर स्वामी, राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला जात आहे. त्यांनी 7 भारतीय लष्करी सेनापतींना 'सैन्य' तसेच आपल्या गुरूंचा आदर करण्याची भारतीय परंपरा सांगितली. जेव्हा त्यांनी सलाम ठोकला ते पाहून माझ्याही अंगावर शहारे आले." आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओला 4 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले असून 5 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. 

 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSoldierसैनिकBengaluruबेंगळूरSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया