शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली; गुजरातच्या व्यापाऱ्याने 11000 हिऱ्यांनी बनवले पोट्रेट, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 14:57 IST

रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली; गुजरातच्या व्यापाऱ्याने 11000 हिऱ्यांनी बनवले पोट्रेट, पाहा Video...

Ratan Tata : भारताचे अमूल्य 'रत्न', म्हणजेच दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 86 वर्षीय रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलेल्या रतन टाटांच्या मृत्यूने देशातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, रतन टाटा यांना गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

हिऱ्यापासून बनवला रतन टाटांचा फोटो रतन टाटांचे चाहते आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच, सूरतच्या एका हिरे व्यापाऱ्याने तब्बल 11000 अमेरिकन हिऱ्यांच्या मदतीने रतन टाटांचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले आहे. विपुलभाई जेपीवाला, असे हे पोर्ट्रेट बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. त्यांनी दिवंगत रतन टाटांचे हिऱ्यांच्या साहाय्याने मोठे पोर्ट्रेट बनवून त्यांना अनोखी भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.

फोटो बनवण्यासाठी 11000 हिऱ्यांचा वापर पोर्ट्रेट बनवणाऱ्या या कलाकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कलाकाराने लहान अमेरिकन हिऱ्यांनी त्यांचे मोठे चित्र बनवले आहे. हे पोर्ट्रेट हुबेहुब दिवंगत रतन टाटा यांच्यासारखे दिसते. या अवघड कामासाठी कलाकाराची स्तुती करावी तेवढी कमी आहे. हिऱ्यांपासून बनवलेले हे पोर्ट्रेट अतिशय चमकदार आहे. 

व्हिडिओ पाहून सगळेच भावूक हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हिऱ्यांनी बनवलेले दिवंगत रतन टाटांचे चित्र पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. ते तयार करणारे व्यापारी आणि कलाकार विपुलभाई जेपीवाला यांचे लोक कौतुकही करत आहेत. तसेच, हे पोर्ट्रेट पाहून अनेकजण भावूकही झाले. त्यांनी कमेंट करून रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल