सोशल मीडियावर एका कारअपघाताचा भीषण व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसू शकते की, एक तरुणी ही कार चालवत होती. कारचा वेग एवढा होता की, तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला घसरत उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.
सुदैवाने तरुणी बचावली -कार उलटताना तिच्या हवेत उडणाऱ्या ठिकऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. एवढेच नाही तर कारचा वेग एवढा होता की, ती उलटत असताना तिच्यातील मुलगीही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. सुदैवाने तिचा जीव वाचला. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिला गंभीर दुखापत झाली असून, स्थानिकांनी आणि रस्त्यावरील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिची मदत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती देण्यात आली आणि तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र ही घटना नेमकी कुठली हे अद्याप समजू शकलेले नाही.
हा संपूर्ण अपघात जवळच्या सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओवरून कारच्या वेगाचा अंदाज येऊ शकतो. अर्थात कारचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा, हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांनी चालक तरुणी विरोधात गुन्हा दाखल - दरम्यान, पोलिसांनी चालक तरुणी विरोधात वेगात वाहन चालवणे आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने सड़क सुरक्षा उपाय कडक करण्याचे आणि वाहनचालकांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Summary : A speeding car driven by a young woman crashed and flipped, ejecting her. She survived with serious injuries and is hospitalized. Police have filed charges against her for reckless driving. The accident, captured on CCTV, highlights the dangers of speeding.
Web Summary : एक युवती द्वारा चलाई जा रही तेज़ रफ्तार कार पलट गई, जिससे वह बाहर जा गिरी। गंभीर चोटों के साथ वह बच गई और अस्पताल में भर्ती है। पुलिस ने लापरवाही से गाड़ी चलाने के आरोप में मामला दर्ज किया है। सीसीटीवी में कैद दुर्घटना में तेज गति के खतरे उजागर हुए।