शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

VIDEO : शेजारी असावा तर असा! स्वत:चे प्राण पणाला लावत आगीत अडकलेल्या चिमुकल्याचे वाचवले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:06 IST

ब्राझीलमधील एका रहिवासी इमारतीतील आगीच्या दुर्घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Social Viral : शेजारधर्म ही सध्याच्या घडीला दुर्मिळ होत असली तरी अत्यंत महत्वाची गोष्ट समजली जाते. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या या शेजाऱ्यांसोबतच नातं म्हणजे सौदार्हपूर्ण आणि नेहमीच आंबट-गोड पद्धतीचं असतं. 

पण शेजारधर्माची व्याख्या काळानूरूप बदलत चालली आहे. बिल्डिंगमधील  प्रत्येक मजल्यावरील बंद दरवाजाने शेजारधर्म हा शब्दच संपुष्टात आणला आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ त्याला अपवाद ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एका शेजाऱ्याने केलेल्या कृतीने अनेकांपुढे आदर्श ठेवला आहे. दरम्यान, ब्राझीलमध्ये एका बिल्डिंगच्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्या सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या चिमुकल्याचा रेस्क्यू व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कौतुकोद्गार काढलेत. 

ब्राझीलमधील एका रहिवासी इमारतीतील आगीच्या दुर्घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याने फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. दुर्दैवाने या आगीमध्ये अडकलेल्या एका ६ वर्षाचा मुलगा अडकला होता. त्या मुलाची शेजाऱ्याने आपले प्राण पणाला लावून सूटका केली. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्लिडिंगच्या ४थ्या मजल्यावर एका लहान मुलगा अडकलेला दिसतोय. जीवाच्या आकांताने ओरडत  आपल्या मदतीसाठी तो हाक मारताना दिसत आहे. हा प्रकार लक्षात येताच अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शेजारी अपार्टमेंटमधील गॅलरीतून सीढीच्या साहाय्याने त्या मुलापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तो माणूस आग लागलेल्या ठिकाणी पोहचण्यात यशस्वी होतो. मिळालेल्या माहितीनूसार, आगीचे लोट आणि धुराचा त्रास झाल्यामुळे त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या शेजाऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

goodnews_movement या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर "The bravery shows bt those selfless men " अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तसेच दुसरा एक यूजर म्हणतो, "The neighbour is hero" अशी कमेंट त्याने केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBrazilब्राझीलfireआग