Viral Video: दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक व्यक्ती भरपूर दारू प्यायला आणि नंतर त्याने जे काही केलं, त्याने गावातील लोकांच्या ह्रदयाचे ठोकेच चुकवले. हा व्यक्ती थेट विजेच्या तारांवरच जाऊन झोपला.
एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक माणूस विजेच्या तारावर झोपलेला दिसत आहे. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील आहे.
आंध्र प्रदेशातील पार्वतीपुरम मन्यम जिल्ह्यात असलेल्या सिंगुपूरम गावात ही घटना घडली आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत खांबावर चढला आणि विजेच्या तारांवर जाऊन झोपला. पण, तो वर चढत असल्याचे बघून काही लोक त्याच्या दिशेने धावले.
तोपर्यंत जास्त वर चढला होता. तो तारांपर्यंत पोहचेपर्यंत गावकऱ्यांनी धावपळ करत विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतरही तो विजेच्या तारांवर जाऊन झोपला. हा प्रकार घडत असताना सगळ्या ग्रामस्थानी तिथे गर्दी केली होती. गावकऱ्यांनी नंतर त्याला सुरक्षिपणे खाली उतरवले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.