ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 20:17 IST2025-08-18T20:17:22+5:302025-08-18T20:17:41+5:30
अर्धवट खाल्लेल्या टोस्टचा फोटो एवढा व्हायरल झाला की लोकांनी मजेशीर अंदाजात त्यावर हसण्याचा आनंद घेतला.

ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंकांनी एक फोटो पोस्ट केला आहे, तो पाहून आधी लोक गोंधळले परंतू नंतर आकार पाहून त्या फोटोवर कमेंट करू लागले आहेत. हा अर्धवट खाल्लेल्या टोस्टचा फोटो एवढा व्हायरल झाला की लोकांनी मजेशीर अंदाजात त्यावर हसण्याचा आनंद घेतला.
गोएंका (@hvgoenka) यांनी १६ ऑगस्टला हा फोटो शेअर केला आहे. यावर कॅप्शनमध्ये त्यांनी मी टोस्ट खात होतो आणि मग मला काहीतरी दिसू लागले... तुम्हालाही ते दिसतंय का? असे लिहिले होते. लोकांनी हा फोटो पाहिला, सुरुवातीला गोंधळले परंतू त्यांना नंतर समजले की या टोस्टचा आकार दुसरा तिसरा कोणासारखा नाही तर अवघ्या जगाचा छळ सुरु केलेले महाशय डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. टोस्टच्या खाल्लेल्या कडांचा आकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.
मग काय थांबतात ते नेटकरी कुठले... त्यांनी एकेक मजेशीर कमेंट पास करण्यास सुरुवात केली. या टोस्टमुळे आता तुमच्या पोटात ३०% शुल्क येईल, लवकर काम पूर्ण करा, नाहीतर शुल्क आणखी वाढेल अशा कमेंट करण्यास सुरुवात केली.