आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:03 IST2025-09-19T12:03:14+5:302025-09-19T12:03:38+5:30

71-Year-Old Woman Leela Jose Skydiving : वय हा केवळ एक आकडा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं

71-Year-Old Kerala Woman Leela Jose Goes Viral For Skydiving From 13,000 Ft In Dubai | आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'

आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'

71-Year-Old Woman Leela Jose Skydiving : सोशल मीडियावर काहीही घडू शकतं. यावर कधी काय व्हायरल होईल याची काहीच कल्पना नसते. पण काही वेळा सोशल मीडियातून आपल्याला प्रेरणाही मिळते. तसेच एक प्रकरण सध्या चर्चा आहे. केरळमधील एका ७१ वर्षीय महिलेने एक असा पराक्रम केला आहे, जो पाहून तिशी-चाळीशीतल्या अनेकांनाही घाम फुटेल. या ७१ वर्षीय महिलेने चक्क १३,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून एक अनोखा विक्रम रचला आहे. ती १३,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करणारी सर्वात वयस्क महिला बनली आहे. या महिलेचे नाव लीला जोस आहे. ती इडुक्की जिल्ह्यातील कोन्नाथडी येथील आहे. वय हा केवळ आकडा असतो हे लीलाने सिद्ध केले आहे.

मुलाला वाटले आई मस्करी करतेय...

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, जेव्हा लीलाने तिच्या शहराच्या वर आकाशात विमाने उडताना पाहिली, तेव्हा तिला आपणही असे करावे असे वाटले. लोकांनी महिलेची चेष्टा केली. पण लीलाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या स्वप्नावर लक्ष केंद्रीत केले. लीला गेल्या महिन्यात दुबईला तिच्या मुलाला भेटण्यासाठी गेली, त्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. तिने मुलाला स्कायडायव्हिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला त्याला वाटले की ती मस्करी करत आहे. पण लीलाने स्पष्ट केले की तिला हे करायचेच आहे. त्यानंतर मुलाने तिची स्कायडायव्हिंगची इच्छा पूर्ण केली.

२ लाखांचा खर्च

मुलगा अनिशने दुबईच्या स्कायडायव्हिंग टीमसोबत टँडम जंप बुक केला, ७१ वर्षीय महिलेला पाहून सारेच अवाक् झाले. अनिशने फ्लाइट, प्रशिक्षक आणि व्हिडिओग्राफी सगळी व्यवस्था केली. याचा एकूण खर्च सुमारे २ लाख झाला. पण त्यातून त्याने आपल्या आईला एक अविस्मरणीय आठवण दिली.

Web Title: 71-Year-Old Kerala Woman Leela Jose Goes Viral For Skydiving From 13,000 Ft In Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.