५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:38 IST2025-01-23T14:38:17+5:302025-01-23T14:38:58+5:30

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका जुन्या महालात उभी आहे. महालाच्या एका वरच्या रूममध्ये तो आहे आणि दाखवत आहे की, एक छोटी कपाटासारखी जागा आहे.

500 years old cooling system how kings manage in summers without cooler | ५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ...

५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ...

आज आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी बघतो, त्या आजपासून ४०० ते ५०० वर्षांआधी अस्तित्वात नव्हत्या. अशात आपले पूर्वज गोष्टी कसे मॅनेज करत असतील? विज्ञान त्यावेळी इतका प्रगत झाला नव्हता. त्यामुळे आज जशा सुविधा मिळतात, त्या तेव्हा मिळत नव्हत्या. पण बदलत्या काळानुसार आता तेव्हाच्या गोष्टी पासून अचंबित व्हायला होतं.

हिवाळ्यात हीटर आणि उन्हाळ्यात कुलर-एसीचा वापर केल्याशिवाय पर्याय नसतो. अशात जरा असा विचार करून बघा की, त्यावेळी एसी-कुलर काहीच नव्हतं, मग ते शांततेत कसे झोपत होते? असं अजिबात नाही की, त्यांनी सुविधेसाठी काहीच केलं नाही. त्या काळातही लोक काहीना काही व्यवस्था करतच होते.

राजे-महाराजांचा कूलर

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका जुन्या महालात उभी आहे. महालाच्या एका वरच्या रूममध्ये तो आहे आणि दाखवत आहे की, एक छोटी कपाटासारखी जागा आहे. व्यक्तीनं सांगितलं की, ही ५०० वर्ष जुनी कुलिंग सिस्टीम होती. ज्यात एका छिद्राच्या मदतीनं एका रॉड टाकला जात होता. रॉडच्या बाहेरच्या बाजूनं एक मोठा लाकडाचा पंखा होता आणि आतल्या बाजूनं एक छोटा पंखा होता. ती जी कपाटासारखी जागा आहे त्यात केसरचं पाणी ठेवलं जात होतं आणि पुढच्या बाजूला खसच्या पडद्यांनी कव्हर केलं जात होतं. अशात मागचा पंखा एक्झॉस्टचं काम करत होता आणि पुढचा पंखा पाणी आणि खसच्या माध्यमातून थंड हवा देत होता.

इन्स्टाग्रामवर theamazingbharatofficial नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी या सिस्टीमचं कौतुक केलं आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही म्हणाले की, तेव्हा इतकं तापमानही राहत नसेल. त्यामुळे यानं काम चालत होतं.

Web Title: 500 years old cooling system how kings manage in summers without cooler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.