शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

Pregnant dsp : सलाम! रणरणत्या उन्हात गर्भवती  महिला DSP कर्तव्यावर हजर; अन् नियम मोडत लोक निघालेत फिरायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 14:39 IST

5 month pregnant dsp doing duty : स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगभरात  अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसनं कहर केलेला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाबाधितांची आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच देशातील शासकीय यंत्रणा लॉकडाऊन राबवण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत आरोग्य व्यवस्था, प्रशासकिय यंत्रणांवर प्रचंड ताण आलेला दिसून येतो.

स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू (5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh) यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना कोरोनाची तीव्रता समजावून सांगत आहेत. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्या करत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच या महिला पोलिसाच्या कर्तव्याला सलामही ठोकला आहे. 

आयपीएस अधिकारी दिपांषु काब्रा यांनी गरोदरपणात कर्तव्य बजावणाऱ्या शिल्पा साहू यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शिल्पा यांनी लोकांना आवाहन केले की, आज आम्ही रस्त्यावर उभे आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहू शकाल. बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...

कोरोनाच्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, काहींनी मात्र, त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, काम करू नये म्हणत सुनावलं आहे. भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला