बाबोsss! एका रिक्षातून तब्बल २७ जणांचा प्रवास; Video तुफान व्हायरल 

By ओमकार संकपाळ | Updated: July 12, 2022 11:41 IST2022-07-12T11:40:58+5:302022-07-12T11:41:24+5:30

मोजणी करताना पोलीसही चक्रावले. पाहा व्हिडीओ.

27 people traveling in one rickshaw Video Viral police shocked while counting | बाबोsss! एका रिक्षातून तब्बल २७ जणांचा प्रवास; Video तुफान व्हायरल 

बाबोsss! एका रिक्षातून तब्बल २७ जणांचा प्रवास; Video तुफान व्हायरल 

फतेहपूर : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून रविवारी एक थक्क करणारा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला पोलिसांनी अडवले तेव्हा त्यातून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या पाहून पोलीस पार चक्रावून गेले. कारण या रिक्षात १, २, ३ किंवा ४ नव्हे तर, चालकासह तब्बल २७ लोक प्रवास करीत होते. 

ही घटना कोतवाली बिंदकीच्या लालौली चौकातील आहे. फतेहपूर जिल्ह्यातील बिंदकी कोतवाली परिसरात काही लोक ऑटो रिक्षातून निघाले होते. ऑटोचालक मेहराहा येथील रहिवासी आहे. 


एका रिक्षात २७ जण बसूच कसे शकतात?
बिंदकी परिसरातील लालौली चौकात एक रिक्षा चालक सुसाट वेगाने रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी धाव घेत रिक्षा थांबवली. यानंतर पोलिसांनी एकामागून एक लहान मुलांसह वृद्धांना बाहेर काढले. मोजणी केली असता चालकासह तब्बल २७ जण ऑटोतून बाहेर पडले. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला चांगलेच फटकारले आणि कारवाई करीत रिक्षा जप्त केली. 

पोलीस ऑटोमधून लोकांना उतरवत असतानाच कोणीतरी व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  एका ऑटोरिक्षात २७ जण बसूच कसे शकतात, यावरून सध्या सोशल मीडियासह परिसरातील नागरिकांमध्येही बरीच चर्चा रंगली आहे.

रिक्षा जप्त  
सर्व लोक ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यासाठी घरातून बिंदकी येथे आले होते. पोलिसांनी एकामागून एक मोजणी करून सर्वांना खाली उतरवले. कारवाई करीत पोलीस रिक्षा जप्त करून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 

Web Title: 27 people traveling in one rickshaw Video Viral police shocked while counting