लय भारी! सूट-बूट घालून पाणीपुरी विकतोय 'हा' तरुण; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:42 IST2022-04-07T14:33:53+5:302022-04-07T14:42:25+5:30

पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीने सूट-बूट घालून पाणीपुरी विकताना दिसत आहे. त्याच्या याच लूकची आणि सोबतच त्याच्या पाणीपुरीची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. 

22 year old punjab boy sells golgappa and chaat dressed in suit video goes viral on social media | लय भारी! सूट-बूट घालून पाणीपुरी विकतोय 'हा' तरुण; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

लय भारी! सूट-बूट घालून पाणीपुरी विकतोय 'हा' तरुण; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

नवी दिल्ली - पाणीपुरी ही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. दिल्ली असो किंवा मग मुंबई सर्वत्र पाणीपुरीचे स्टॉल हमखास पाहायला मिळतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध स्ट्रीट फूड विक्रेत्यांचे व्हिडीओ (Video) नेहमीच व्हायरल होत असतात. अशाच एका स्ट्रीट फूड विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, पण खास गोष्ट म्हणजे यामध्ये पाणीपुरी विकणारी व्यक्ती सूट-बूट घालून पाणीपुरी विकताना दिसत आहे. त्याच्या याच लूकची आणि सोबतच त्याच्या पाणीपुरीची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. 

सूट-बूट घालून पाणीपुरी विकणारा हा मुलगा पंजाबचा रहिवासी असून अवघा 22 वर्षांचा आहे. तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्टॉलवर पाणीपुरी, शेवपूरी यासारखे चाटच्या, विविध प्रकारची विक्री करत आहे. मात्र, याचदरम्यान घातलेल्या खास ड्रेसमुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. मुलगा वेगवेगळ्या प्रकारच्या चाट कसा बनवतोय आणि ग्राहकांना देतोय हे बघायला मिळतं. 

काही दिवसांपूर्वी YouTuber आणि फूड ब्लॉगर हॅरी उप्पलने या दुकानाला भेट दिली आणि एक व्हिडीओ बनवला आणि तो YouTube वर शेअर केला. मुलगा सूट-बूट घालून पाणीपुरी आणि चाट का विकतो हे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. 24 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. अनेकांनी या मुलाची स्तुती केली असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: 22 year old punjab boy sells golgappa and chaat dressed in suit video goes viral on social media