(Image Credit : psychologytoday.com)
जगात असे अनेक प्रश्न असतात ज्यांचं काहीच उत्तर नसतं. काही प्रश्न विचारल्यावर तर हसावं की रडावं हेच कळत नाही. कधी कधी तर काही प्रश्नांनी डोक्याचं दही होतं. अनेकदा तर समोरून आलेला प्रश्न बरोबर आहे की नाही हेच कळत नाही. खरंतर अशाप्रकारचे विचित्र प्रश्न पडायला डोकं नाही तर क्रिएटीव्हिटी लागते. असेच काही लोकांना पडणारे विचित्र प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जास्त मनावर घेऊ नका.
१) जर 21 ला इंग्रजीमध्ये 'Twenty One' म्हटलं जातं, तर 11 ला 'Onety-One' का नाही?
२) भांडी घासण्याच्या साबणात खरं लिंबू आणि लिंबाच्या ज्यूसमध्ये Artificial Flavors, असं का?
3) २ मिनिटात होते असं सांगितली जाणारी मॅगी दोन मिनिटाक कार होत नाही?
४) महिला तोंड बंद करून मस्करा का लावू शकत नाहीत?
५) Donald Duck आंघोळ करून बाहेर येताना टॉवेल गुंडाळतो, पण पॅंट का घालत नाही?
६) जर पादल्यानंतर फार हलकं वाटतं, तर लोक पादण्यासाठी लाजतात का?
७) गोल आकाराचा पिझ्झा चौकोणी आकाराच्या डब्यात का दिला जातो?
८) जेव्हा ग्रीनलॅंड बर्फाने झाकलेलं असतं, तर याचं नाव ग्रीनलॅंड का?
९) कंपनीवाले 'तुम्हाला ही नोकरी का करायची आहे?' असं का विचारतात?
१०) बर्फ वितळण्याआधी पांढरा असतो, वितळल्यावर पांढरा रंग कुठे जातो?
तुम्हालाही असे प्रश्न कधीना कधी नक्कीच पडले असतील. पण उत्तरं काही मिळाली नसतील.