जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला जलजीवन मिशन योजनेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:16 PM2021-04-28T17:16:07+5:302021-04-28T17:18:16+5:30

Zp Kudal Sindhudurg : जलजीवन मिशन या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा केला.

Zilla Parishad President reviews Jaljivan Mission Plan | जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला जलजीवन मिशन योजनेचा आढावा

कुडाळ येथे संजना सावंत यांचे स्वागत सभापती नूतन आईर यांनी केले. यावेळी रणजित देसाई, विजय चव्हाण, डॉ. संदेश कांबळे, नागेश परब, पप्या तवटे आदी उपस्थित होते. (छाया : रजनीकांत कदम)

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला जलजीवन मिशन योजनेचा आढावाकुडाळ तालुक्याला भेट, कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश

कुडाळ : जलजीवन मिशन या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा केला.

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व सदस्य रणजित देसाई, सभापती नूतन आईर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, बाव सरपंच नागेश परब, पावशीचे माजी सरपंच पप्या तवटे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आदी उपस्थित होते.

यावेळी सावंत यांनी कुडाळ नाबरवाडी येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम ठिकाणी भेट दिली. ५० निवासी रूम व प्रशिक्षण हॉल असलेल्या या भव्यदिव्य केंद्राचे बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणेस आदेश दिले.

त्यानंतर उमेश गाळवणकर यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. ते राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक करून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. सोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी अध्यक्ष यांच्या सहमतीने रोटेशन पद्धतीने काही डॉक्टर्स व परिचारक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही होत असल्याचे सांगितले. सभापती नूतन आईर यांनी सर्वांचे आभार मानले. या बैठकीचे चांगले नियोजन केल्याबद्दल संजना सावंत यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कौतुक केले.

तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाड्या यामध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन झालेले असून ज्या ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश मिळाले नसतील तर त्या ग्रामपंचायतीने ते प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणत्याही ग्रामपंचायतीची गरसोय होत असल्यास याबाबत आपल्याशी थेट संपर्क साधण्याच्या सूचना अध्यक्ष संजना सावंत यांनी दिल्या.

कुडाळ तालुक्यात २१६ जण होम आयसोलेशनमध्ये

कुडाळ तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संजना सावंत यांनी संवाद साधला. कुडाळ तालुक्यात २१६ जण होमआयसोलेशनमध्ये असून त्यांना आवश्यक वाटल्यास रुग्णालयांमध्ये भरती करण्याबाबतदेखील दक्षता घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Web Title: Zilla Parishad President reviews Jaljivan Mission Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.