शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

युवराज वारंग मृत्यू प्रकरण : चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा, ९ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:35 IST

Crimenews, Police, Kudal, Sindhudurngnews हळदीचे नेरूर-तिवरवाडी येथील युवराज वारंग (१८) याच्या छातीत बंदुकीचा छर्रा घुसून झालेल्या मृत्यूप्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार संशयितांना शनिवारी ताब्यात घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देयुवराज वारंग मृत्यू प्रकरण : चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा९ पर्यंत पोलीस कोठडी

कुडाळ : हळदीचे नेरूर-तिवरवाडी येथील युवराज वारंग (१८) याच्या छातीत बंदुकीचा छर्रा घुसून झालेल्या मृत्यूप्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार संशयितांना शनिवारी ताब्यात घेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी चारही संशयितांना ९ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच घटनास्थळी जंगलातून दोन बंदुकाही ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.२६ नोव्हेंबर रोजी युवराजच्या छातीत काडतूस बंदुकीचा छर्रा घुसून त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याच्या घरापासून २५० ते ३०० मीटर अंतरावर असलेल्या जंगलमय भागात घडली होती. युवराजच्या छातीत घुसलेला छर्रा हा अन्य कुणाकडील बंदुकीने घुसला असल्याच्या तसेच शिकारीसाठी १० ते १२ जण असण्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून तसा तपास सुरू केला होता.दरम्यान, शनिवारी रात्री या प्रकरणी केतन आगलावे (२७, रा. चाफेली-दळवीवाडी), शिवाजी घाडी (३१, रा. हळदीचे नेरूर), सुनील राऊळ (२६, रा. वाडोस) व अमरेश कविटकर (३२, रा. हळदीचे नेरूर) या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना ९ डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अजून काही जण शिकारीस गेल्याचा संशययातील संशयित केतन आगलावे याला दोन ठिकाणी बंदुकीचे छर्रे अंगात घुसून तो जखमी झाला आहे. त्याने जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार करून घेतले अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घटनास्थळी जाऊन करीत असताना दोन काडतुसाच्या बंदुका सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी १० ते १२ जण जंगली प्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने गेले होते अशीही माहिती मिळत असून अजून किती जण आहेत याचा तपास करीत आहोत, अशी माहिती कोरे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशन