सांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:57 AM2019-11-04T11:57:09+5:302019-11-04T11:58:07+5:30

सांगुळवाडी फाटकवाडी येथील सुमित रवींद्र रावराणे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वडील रवींद्र निळकंठ रावराणे यांनी पोलिसांत माहिती दिली.

Youth suicide | सांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्या

सांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देसांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्यासावंतवाडी माठेवाडातील विवाहितेची आत्महत्या

वैभववाडी : सांगुळवाडी फाटकवाडी येथील सुमित रवींद्र रावराणे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वडील रवींद्र निळकंठ रावराणे यांनी पोलिसांत माहिती दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री जेवण आटोपून सुमित आपल्या खोलीत झोपण्यास गेला. सकाळी नेहमीप्रमाणे तो उठला नाही. म्हणून वडील निळकंठ सुमित झोपलेल्या खोलीत गेले तेव्हा सुमित गळफास घेतलेल्या स्थितीत छपराला लटकताना आढळून आला.

छपराच्या वाशाला साडीने त्याने गळफास घेतला. याबाबत त्याचे वडील रवींद्र रावराणे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सुमितचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

सावंतवाडी माठेवाडातील विवाहितेची आत्महत्या

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे राहणाऱ्या हेमांगी शंकरप्रसाद तारी (२८) या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिला उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तत्पूर्वी ती मृत पावली. आत्महत्येमागचे कारण समजले नाही.

शहरातील मच्छी व्यवसायिक शंकरप्रसाद तारी, त्यांची पत्नी व एक मुलगी असे तिघे जण माठेवाडा येथील घरी राहत होते. मात्र, पती शंकरप्रसाद हे काहीतरी कामानिमित्त शनिवारी सकाळी बाहेरगावी गेले होते. ते घरी नसल्याचे बघून हेमांगी यांनी विष प्राशन केले. तिला तत्काळ सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचे निधन झाले होते.

याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची माहिती मृत हेमांगी यांचे दीर शैलेश तारी यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. दुपारी उशिरा डॉक्टर अभिजीत चितारी यांनी शवविच्छेदन केले. विष प्राशनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Youth suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.