युवा दशावतार कलावंत शांती कलिंगण यांचे निधन

By अनंत खं.जाधव | Updated: October 10, 2022 14:53 IST2022-10-10T14:52:42+5:302022-10-10T14:53:20+5:30

सिंधुदुर्गावर शोककळा.

Youth Dashavatar Artist Shanti Kalingan passed away maharashtra sindhudurga | युवा दशावतार कलावंत शांती कलिंगण यांचे निधन

युवा दशावतार कलावंत शांती कलिंगण यांचे निधन

सिंधुदुर्ग: दशावतार कलेतील लोकराजा म्हणून ओळख निर्माण केलेल्या सुधीर कलिंगण यांचे पुतणे युवा दशावतार कलाकार दशावतारातील खलनायक शांती कलिंगण (30) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गोवा बाबुळी येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आपल्या अभिनय शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी छाप उमटवली होती. दरम्यान, लोकप्रिय दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनास अद्याप वर्ष देखील झाले नसून कलिंगण कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दशावतातील लोकराजा म्हणून सुधीर कलिंगण यांची ओळख होती. त्याप्रमाणे शांती कलिंगण हे वयाने लहान असले तरी दशावतार कलेत खलनायक या व्यक्तीरेखेवर एक वेगळी छाप उमटवली होती. ते खलनायक च म्हणूनच ओळखले जायचे.

Web Title: Youth Dashavatar Artist Shanti Kalingan passed away maharashtra sindhudurga