धिंगाणा घालणाऱ्या युवकाचा पोलिसाच्या हाताला चावा
By Admin | Updated: November 18, 2014 23:32 IST2014-11-18T23:04:17+5:302014-11-18T23:32:59+5:30
त्याच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

धिंगाणा घालणाऱ्या युवकाचा पोलिसाच्या हाताला चावा
सावंतवाडी : सावंतवाडी - माठेवाडा येथील जत्रोत्सवात धिंगाणा घालणाऱ्या गजेंद्र पंजाबराव धाकडे (वय २५, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेत असताना त्याने पोलीस कर्मचारी डी. बी. पालकर यांच्या हाताचा चावा घेतला. सावंतवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काल, सोमवारी सावंतवाडी - माठेवाडा येथे जत्रोत्सव होता. शहरातील जत्रोत्सव असल्याने मोठी गर्दीही झाली होती. यावेळी गजेंद्र धाकडे या युवकाने ध्ािंगाणा घालण्यास सुरुवात केली. तसेच जत्रोत्सवाला आलेल्या नागरिकांच्या उभ्या करून ठेवलेल्या दुचाक्या पाडू लागला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस त्याला घेऊन पोलीस ठाण्यात येत असतानाच धाकडे याने पोलीस कर्मचारी डी. बी. पालकर यांच्या हाताचा चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला पकडून ठाण्यात नेले. दरम्यान, आज, मंगळवारी त्याच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. (वार्ताहर)